वडील रणधीर यांना मारहाण होताना पाहून करीनाला आलं रडू, पकडले होते 'या' अभिनेत्याचे पाय

अमिताभ यांनी नुकताच शेअर केलेला करीनाचा फोटो संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या फोटोसंबंधीत सत्य आता बाहेर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 11:45 AM IST

वडील रणधीर यांना मारहाण होताना पाहून करीनाला आलं रडू, पकडले होते 'या' अभिनेत्याचे पाय

मुंबई, 19 मे : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात बेबी करीना कपूर दिसत आहे. अमिताभ यांनी हा फोटो शेअर करताना लिहिलं, 'ओळखा पाहू कोण आहे ही मुलगी ? गोवा मध्ये 'पुकार' सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी सेटवर उपस्थित असलेली ही बेबी गर्ल करीना कपूर आहे. ती इथं तिचे वडील रणधीर कपूर यांच्यासोबत आली होती आणि अचानक तिच्या पायांना दुखापत झाली. तुमचा लाडका अभिनेता तिला औषध लावत आहे.' अमिताभ आणि करीना यांचा हा फोटो संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या फोटोसंबंधीत एक किस्सा आता खूप चर्चेत आला आहे. जो करीना आणि तिचे वडील रणधीर कपूर यांच्यातील खास बाँडिंगशी जोडलेला आहे.


अमिताभ यांनी शेअर केलेला करीनाचा हा फोटो 'पुकार' सिनेमाच्या सेटवरील असून त्यावेळी खरं तर एक भावूक करणारा किस्सा सेटवर घडला होता. यावेळी या सिनेमातील अमिताभ आणि रणधीर यांच्यातील फाइटचा एका सीनचं शूटिंग केलं जात होतं. पण शूट सुरू झाल्यावर करीना जोरजोरात रडू लागली. एवढचं नाही तर ती धावत ज्या ठीकणी शूट सुरू होतं तिथं गेली आणि अमिताभ यांचे पाय पकडून त्यांना विनवणी करू लागली की प्लिज माझ्या बाबांना मारू नका.

अमिताभ यांना काही समजून ते सावरतात न सावरतात तोपर्यंत करीना खाली पडली आणि तिला दुखापत झाली. या सर्व गोंधळात सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं. अमिताभ यांनी करीनाला लगेच उचलून घेतलं. तिला औषध लावलं आणि बरेच प्रयत्न करून तिचं रडू थांबवलं. ही घटना घडली त्यावेळी करीना अवघ्या तीन वर्षांची होती. त्यानंतर हा सीन पुन्हा शूट करण्यात आला. हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आणि हा सिनेमा अमिताभ यांच्या सुपरहिट सिनेमांपैकी एक ठरला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...