प्रियकराच्या निधनातून सावरतेय संजय दत्तची मुलगी, म्हणाली...

त्रिशाला दत्तच्या प्रियकराचं 2 जुलै रोजी निधन झालं होतं. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून स्वतः त्रिशालाने यासंबंधीत माहिती दिली होती. प्रियकराच्या मृत्यूमुळे त्रिशाला नैराश्यात गेली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 06:59 PM IST

प्रियकराच्या निधनातून सावरतेय संजय दत्तची मुलगी, म्हणाली...

मुंबई, 30 जुलै- संजय दत्तची ग्लॅमरस मुलगी त्रिशाला नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती सतत स्वतःचे अनेक हॉट फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. 4 जुलै रोजी त्रिशालाने तिच्या प्रियकराचं आकस्मित निधन झाल्याची पोस्ट शेअर केली. त्रिशालाने प्रियकरासोबतचा फोटो शेअर करत एक भावुक मेसेजही लिहिला. प्रियकराच्या निधनामुळे त्रिशाला किती खचली आहे हे तिच्या पोस्टवरून स्पष्ट कळत होतं. त्या पोस्टनंतर त्रिशालाजणू सोशल मीडियावरून गायबच झाली होती. 4 जुलैनंतर तिने आज इन्स्टाग्रामवर स्वतःचा ग्लॅमरस फोटो शेअर केला. यावेळीही तिने प्रियकराच्या आठवणीत भावनिक मेसेज लिहिला.

त्रिशालाचं कॅप्शन वाचून हे नक्कीच कळतं की ती अजूनही प्रियकराच्या निधनाला विसरू शकली नसून त्यातून बाहेर येण्याचा ती प्रयत्न करत आहे. त्रिशाला दत्तने लिहिले की, 'या आठवड्याच्या शेवटाला स्वतःला नव्याने उभं राहण्याची हिंम्मत देत तयार झाली आणि चेहऱ्यावर हसू आणत जवळच्या मैत्रीणीच्या लग्नाला पोहोचले. माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि नववधू फार सुंदर दिसत होती. गेले काही आठवडे माझ्यासाठी क्लेशदायी होते. मी या सगळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला त्याची खूप आठवण येते. माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे.'

या पोस्टमध्ये त्रिशालाने तिला या सर्वातून बाहेर काढण्यात मदत केलेल्या दोन जवळच्या मित्रांचेही आभार मानले. शेअर केलेल्या या फोटोत त्रिशाला फार सुंदर दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या या गाउनमध्ये त्रिशालाने ग्लॅमरस पोज दिली आहे. तिचा हा फोटो पाहून त्रिशाला बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

त्रिशाला दत्तच्या प्रियकराचं 2 जुलै रोजी निधन झालं होतं. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून स्वतः त्रिशालाने यासंबंधीत माहिती दिली होती. प्रियकराच्या मृत्यूमुळे त्रिशाला नैराश्यात गेली होती. पण आता हळूहळू ती या सर्वातून बाहेर येत आहे. त्रिशाला ही संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची ऋचा शर्माची मुलगी आहे. सध्या त्रिशाला दत्त फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

Sacred Games 2 च्या टीझरमध्ये गणेश गायतोंडेने विचारला 'हा' अफलातून प्रश्न

Loading...

Bigg Boss Marathi 2- अतिशहाणपणा नडला, विणा- शिवला मिळणार शिक्षा!

पाकिस्तानी एजंटला विकली भारतीय महिला, सनी देओलने असं आणलं घरी

SPECIAL REPORT : मॅन Vs वाईल्डमध्ये मोदी झळकणार, डिस्कव्हरीने कधी केलं शूटिंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...