लॉकडाऊनमध्ये खासदार नुसरत जहाँचा TikTok वर धुमाकूळ, डान्सचा VIDEO VIRAL

लॉकडाऊनमध्ये खासदार नुसरत जहाँचा TikTok वर धुमाकूळ, डान्सचा VIDEO VIRAL

टिकटॉकवर एका व्हिडिओमध्ये नुसरत जहाँ ब्लॅक टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

  • Share this:

कोलकाता, 24 एप्रिल : तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर सक्रीय आहे. फोटो आणि व्हिडिओ यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता टिकटॉकवरही तिच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरसुद्धा ती अॅक्टिव आहे. लॉकडाऊनमध्ये तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

टिकटॉकवर एका व्हिडिओमध्ये ब्लॅक टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय झाला आहे. याशिवाय तिचे अनेक व्हिडिओ टिकटॉकवर आहेत. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळेतच त्याला 40 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

@nusratchirps##Savage ##savagechallenge ##fyp let’s do it @mimichakraborty86 @srabantigintu my ##savagegirls♬ Savage - Megan Thee Stallion

याआधी नुसरत जहाँ मिमी चक्रवर्तीसोबत एका शॉर्टफिल्ममध्ये दिसली होती. त्यात लोकांना कोरोनाबाबत जागरूक करण्यासाठी एक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. झॉर थामे जाबे एक दिन असं नाव असलेला हा व्हिडिओ युट्यूबवर टाकण्यात आला होता.

@nusratchirpsSong might get over... not my mood..!! ##dancewhenufeellikeit ##dancewithNJ @tiktok_india ##trending ##silhoutte♬ NAINOWALE NE - PADMAAVAT

लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नुसरत या निखिल जैन यांच्याशी लग्नाच्या बेडीत अडकल्या. निखिल जैनशी लग्न केल्यानंतर नुसरतला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. निखिल हिंदू तर नुसरत मुस्लिम असल्यानं तिच्या धर्मगुरुंनी तिच्या विरोधात फतवा काढला होता. यावर  नुसरतने मी दोन्ही धर्मांचा पुरेपूर आदर करते असं सांगत सडेतोड उत्तरही दिलं होतं.

हे वाचा : सोहा अली खानची लेक म्हणतेय गायत्री मंत्र, कोरोना दरम्यान व्हायरल झाला VIDEO

First published: April 24, 2020, 9:02 PM IST

ताज्या बातम्या