मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"हिजड्याचा रोल विश्व सुंदरी करणार"; Taaliचं पोस्टर रिलीज होताच गौरी सावंतची प्रतिक्रिया

"हिजड्याचा रोल विश्व सुंदरी करणार"; Taaliचं पोस्टर रिलीज होताच गौरी सावंतची प्रतिक्रिया

गौरी सावंत

गौरी सावंत

ट्रान्सजेंडर गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ताली या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन गौरी सावंतच्या भूमिकेत आहे. ताली या सिनेमावर गौरी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 06 ऑक्टोबर : अभिनेत्री सुष्मिता सेनच्या नव्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. 'ताली' या वेब सीरिजचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. अभिनेत्री सुष्मिता सेन पहिल्यांदा ट्रांन्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. ट्रान्सजेंडर श्रीगौरी सावंतची भूमिका सुष्मिता साकारणार आहे. गौरी सावंत ही अनेक वर्ष ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी काम करत आहे. अनेक सामाजिक कार्यात तिचा सहभाग असतो. सेक्स वर्करसाठीही गौरी सावंत महत्त्वाचं काम करत आहे. जवळपास 500 हून जास्त ट्रान्सजेंडर्सना गौरी सावंत एकत्र आणले आहेत. अशा गौरी सावंतच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची घोषणा होताच गौरीनं देखील तिचं मत व्यक्त केलं आहे.

सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या तालीचं पहिलं पोस्टर रिलीज होताच. गौरी सावंतनं आजकतशी बोलताना सांगितलं, 'एका हिजड्याची भूमिका विश्व सुंदरी करणार आहे ही आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. सुष्मिता सेन या भूमिकेला पुरेपूर न्याय देईल असं मला वाटतं. जर कोणी मोठ्या अभिनेत्यानं माझं काम केलं असतं कर ते फार फनी वाटलं असतं'.

हेही वाचा - Taali First Look: सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत; समोर आला 'ताली'चा फर्स्ट लुक

श्री गौरी सावतं बोलताना पुढे म्हणाली, 'ट्रान्सजेंडच्या आयुष्यावर बायोपिक तयार होणं ही मोठी गोष्ट आहे. त्यातही अभिनेत्री सुष्मिता सेन माझी भूमिका करत आहे त्यामुळे मी घी डब्ब्यात जाऊन बसले आहे का असं मला वाटत आहे'.

गौरी सावंतची भूमिका कोण साकारणार याविषयी गौरीला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'मला माझी भूमिका कोण साकारणार याविषयी कोणतीही आयडिया नव्हती. मला वाटलं कोणी तरी साऊथ अभिनेता किंवा अभिनेत्री माझी भूमिका साकारेल. कारण माझी अंगकाठी फार मुलांसारखी आहे. जेव्हा मला सुष्मिता सेनचं नाव सांगण्यात आलं तेव्हा मी फार हसले होते. मी रात्रभर हसत होते. मला सतत सुष्मिता सेनचं चुनरी चुनरी गाणं डोळ्यासमोर येत होतं.  मला खरंच आधी सुष्मिता सेन माझी भूमिका करणार यावर विश्वास बसत नव्हता. पण कॉन्ट्रॅक्स साइन केल्यावर मला विश्वास बसला'.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News