शस्रक्रिया करण्यापूर्वी एलन पेज ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. आजवर तिनं ‘एक्स मेन’, ‘इन टू द फॉरेस्ट’, ‘इन्सेप्शन’, ‘जुनो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अष्टपैलू अभिनय शैलीमुळे तिने हॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:च असं एक वेगळ स्थान प्रस्थापित केलं होतं. परंतु एलन आता यापुढे अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणार नाही. कारण तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष लिंग स्विकारलं आहे. त्यामुळं काही चाहते तिच्यावर नाराज आहेत. “लहानपणापासून मला पुरुषांपेक्षा स्त्रियांप्रती जास्त आकर्षण होतं. त्यामुळे मी ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही लोकांना आवडलेला नाही. अनेकांनी माझ्यावर टीका देखील केली. तुम्ही मला पुरुष म्हणा अथवा स्त्री मला काही फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. लक्षात ठेवा आता माझं नाव एलन नसून एलियॉट पेज आहे.” अशा आशयाची पोस्ट लिहून एलियॉटनं आपल्या भावना व्यक्त केल्या. एलन गेली तीन वर्ष एमा पोर्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अलिकडेच तिने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. पत्नीच्या प्रेमाखातर मी लिंग देखील बदलू शकते असं तिनं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर तिने ही शस्त्रक्रिया एमासाठीच केली अशी चर्चा आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Shocking news