• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'लिपस्टिक अण्डर माय बुरखा'चा पहिला ट्रेलर रिलीज

'लिपस्टिक अण्डर माय बुरखा'चा पहिला ट्रेलर रिलीज

स्त्रीवादाचं एक अत्यंत आक्रमक, लिबरल पण तितकंच विचार करायला लावणारं रूप म्हणजे अलंक्रिता श्रीवास्तवचा हा सिनेमा .

  • Share this:
28जून : बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'चा पहिला ट्रेलर रिलीज झालाय. स्त्रीवादाचं एक अत्यंत आक्रमक, लिबरल पण तितकंच विचार करायला लावणारं रूप म्हणजे अलंक्रिता श्रीवास्तवचा हा सिनेमा. चार भिंतीच्या आत दडलेल्या  आणि पुरूष प्रधान संस्कृतीत दबलेल्या 4 मध्यमवर्गीय स्त्रियांच्या अजब  फॅन्टसिझवर हा सिनेमा भाष्य करतोय . या सिनेमात 4 नायिका आहेत . कोंकणा सेन शर्मा एका  गृहिणीची आणि दोन मुलांच्या आईची भूमिका करतेय. तर रत्ना पाठक शाह एका म्हाताऱ्या स्त्रीचा रोल करते जिला तिच्या लैंगिकतेचा शोध म्हातारपणी लागलाय.अहाना  कुमार ही एका छोट्या शहरातल्या अत्यंत बोल्ड महिलेची भूमिका साकारतेय तर प्लबिता बोरठाकूर  ही एका कॉलेजमधल्या तरूणीचा रोल करतेय जिला पॉप सिंगर व्हायचंय. पण  तिच्या आजूबाजूचा  समाज तिला लिपस्टिक लावायचीही परवानगी नाकारतोय. या चौघींमधली कॉमन गोष्ट म्हणजे त्यांच्या  'फॅन्टसीझ' आणि समाज व्यवस्थेविरूद्ध त्यांनी पुकारलेलं बंड. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता हा सिनेमा 21 जुलैला रिलीज होतोय . सिनेमात दाखवलेल्या  स्त्रियांच्या संघर्षापेक्षा  या सिनेमाला सेन्सॉरचं सर्टिफिकेट मिळवायला जास्त संघर्ष करावा लागलाय.  एक वर्ष संघर्ष केल्यानंतर या सिनेमाला  'ए' सर्टिफिकेट मिळालंय. सध्यातरी अत्यंत चकित करणारा आणि विचार करायला लावणारा या सिनेमाचा  ट्रेलर पाहूया.
First published: