30 जून : रणवीरच्या बहुचर्चित 'जग्गा जासूस' या सिनेमाचा 3मिनिटांचा ट्रेलर रिलीज झालाय. डिस्नेचा थाट आणि बॉलिवूडच्या मसाल्याचं अनोखं कॉम्बिनेशन म्हणजे जग्गा जासूस.हा चित्रपट 14 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
जग्गा जासूस एक म्युझिकल कॉमेडी आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीरच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे पैलू उलगडले आहेत. चित्रपटाची भाजणी जरी डिस्ने चित्रपटांची असली तरी त्याला बॉलिवूडच्या भावनांची फोडणी घातलीय. चित्रपटाला संगीत प्रीतमनं दिलंय. संगीतच या सिनेमाचा आत्मा आहे . ट्रेलर पाहताना 'अॅलिस इन वन्डर लँड'ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
या सिनेमात रणवीर आपल्या वडिलांना शोधतोय . त्याला वाटेत कतरिना कैफ भेटते.रणवीर आपल्याशी ट्रेलरमध्ये अनेक ठिकाणी गाण्यांमधूनच संवाद साधतो. ट्रेलर सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्की वाढवतो.
या सिनेमातून रणवीर निर्माता म्हणून प्रथमच पदार्पण करतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: कतरिना कैफ