• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • जब हॅरी मेट सेजल'चा ट्रेलर रिलीज

जब हॅरी मेट सेजल'चा ट्रेलर रिलीज

जब हॅरी मेट सेजल हा सिनेमा 4 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:
21 जुलै : अनेक मिनी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो तो जब हॅरी मेट सेजलचा 3 मिनिटांचा ट्रेलर अखेर आज रिलीज झाला आहे. जब हॅरी मेट सेजल हा सिनेमा 4 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात हॅरी अर्थात शाहरूख खान एका टुरिस्ट गाईड आहे. तर सेजल म्हणजे अनुष्का एक टुरिस्ट आहे. सेजलची अंगठी हरवते. शाहरूख तिला ती अंगठी विसरून पुढे जायला सांगतो तर अनुष्का मात्र तिची अंगठी शोधायचा हट्ट धरते. कारण ती अंगठी तिची एन्गेजमेंट रिंग असते. या रिंगच्या शोधातच त्यांचे प्रेम बहरते अशी सिनेमाची स्टोरी आहे. सिनेमात 'इम्तियाझ मसाला' पुरेपूर भरला आहे. शाहरूख आणि अनुष्का यांची केमिस्ट्रीही जबरदस्तच. ट्रेलर पाहिल्यावर 'जब वी मेट'ची थोडी का होईना पण आठवण येते. आता हा रोमॅन्टिक ड्रामा बॉक्स ऑफिसवर चालतो की आपटतो हे 4 ऑगस्टनंतरच कळेल.
First published: