"लोगों ने इज्जत बख्शी, उसने कुबूल की!" 'हसीना पारकर'चा ट्रेलर रिलीज

हसीना पारकर' या सिनेमाच्या ट्रेलरवरून तो एक क्राईम ड्रामा असल्याचं लक्षात येतं. हसीना पारकरच्या भूमिकेत श्रद्धा कपूर दिसतेय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 05:07 PM IST

18 जुलै: साऱ्या मुंबईला हादरवणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या आयुष्यावर एक बायोपिक लवकरच रिलीज होतोय. मुंबई की 'आपा' असं जिला म्हटलं जातं त्या हसीना पारकरवरच्या या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज झालाय.

'हसीना पारकर' या सिनेमाच्या ट्रेलरवरून तो एक क्राईम ड्रामा असल्याचं लक्षात येतं. हसीना पारकरच्या भूमिकेत श्रद्धा कपूर दिसतेय. पण एकंदर ट्रेलर पाहता तिलाही भूमिका अजून किती तरी चांगली वठवता आली असती असं जाणवतं. ट्रेलरमध्ये हसीना पारकरच्या आयुष्याचे विविध पैलू उलगडले आहेत. 'सर्वसामान्य' हसीना पारकर ते 'गँगस्टर' हसीना पारकर असा प्रवास या सिनेमात दाखवलाय. या सिनेमाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे खऱ्या आयुष्यातले भाऊ बहिणच सिनेमातही भाऊ बहीणीच्या भूमिकेत दिसत आहेत. श्रध्दा कपूरचा सख्खा भाऊ सिध्दांत कपूर दाऊदच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमधून तरी तो दाऊदच्या भूमिकेतून छाप पाडतो. ट्रेलरमधले संवाद विशेष लक्ष वेधून घेतात. एकंदर ट्रेलर सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवतो.

हा सिनेमा 18 ऑगस्टला प्रदर्शित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...