VIDEO : 'भाई'चं ट्रेलर दिमाखात लाँच, सिनेमात केला वेगळा प्रयोग

VIDEO : 'भाई'चं ट्रेलर दिमाखात लाँच, सिनेमात केला वेगळा प्रयोग

'भाई व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचं ट्रेलर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : पु. ल. देशपांडे आणि त्यांचं साहित्य कुठल्याही पिढीतल्या व्यक्तीला एक सुकुन देतं. तुम्ही कितीही तणावात, रागात असाल तरीही पुलंनी लिहिलेला छोटा मजकूरही वाचला तर मनाला आनंद देतो. ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच  नाटकं, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.  ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचं आहे.

'भाई व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचं ट्रेलर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं. त्या सोबतच हा पुलं देशपांडे या व्यक्तिमत्त्वाचा  आवाका पाहता हा सिनेमा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात प्रदर्शित करण्याचा निर्णय दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने घेतलाय.

मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. त्यानुसार येत्या 4 जानेवारी रोजी पूर्वार्ध आणि 8 फेब्रुवारी रोजी उत्तरार्ध रिलीज केला जाईल. आजच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सिनेमाची स्टारकास्ट उपस्थित होती. एकूण 67 कलाकार या दोन्ही भागत काम करताना दिसतील.

ट्रेलर लाँच कार्यक्रमात अभिनेत्री भारती आचरेकर यांनी त्यांची आई माणिक वर्मा यांनी गायलेलं आणि पुलंनी संगीतबद्ध केलेलं कौशल्येचा राम हे गाणं गायलं. तर सिनेमाच्या स्टारकास्टचा एक भाग असलेल्या अमोल बावडेकर यानं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं शब्दावाचून कळले सारे शब्दाचा पलीकडले हे गाणं सादर केलं.

चित्रपटात पुलंची भूमिका सागर देशमुख साकारणार आहे.इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे.पण सागर उमेदीच्या काळातले पुलं दाखवणार, तर सूत्रांच्या माहितीनुसार वयोवृद्ध पुलं साकारणार आहेत विजय केंकरे. आणि वृद्ध सुनीताबाई उभ्या करणार आहेत शुभांगी दामले. हा सिनेमा 4 जानेवारी 2019ला रिलीज होणार आहे.

VIDEO : साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख

First published: December 13, 2018, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading