का म्हणतोय संजय दत्त आपल्या मुलीला 'कॅरेक्टरलेस'? पहा 'भूमी'चा ट्रेलर

का म्हणतोय संजय दत्त आपल्या मुलीला 'कॅरेक्टरलेस'? पहा 'भूमी'चा ट्रेलर

डायलॉग डिलिव्हरीपासून अॅक्शनपर्यंत उत्तम अभिनय या सिनेमात संजय दत्तने केल्याचं या सिनेमाच्या ट्रेलरवरून तरी वाटतंय.

  • Share this:

10 ऑगस्ट: संजय दत्तचा कमबॅक फिल्म भूमीचा ट्रेलर रिलीज झालाय. हा सिनेमा 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

या सिनेमात संजय दत्त पूर्ण तयारीसह परत येतोय असं दिसतंय. डायलॉग डिलिव्हरीपासून अॅक्शनपर्यंत उत्तम अभिनय या सिनेमात संजय दत्तने केल्याचं या सिनेमाच्या ट्रेलरवरून तरी वाटतंय. हा सिनेमा एक बाप आणि त्याच्या मुलीच्या आयुष्याभोवती फिरतो. या सिनेमात संजय दत्तच्या मुलीच्या भूमिकेत अदिती राव हैदरी दिसते आहे. ट्रेलरमध्ये आपल्या मुलीसाठी संजय दत्त सुरुवातीला स्थळ शोधताना दिसतोय. एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य पूर्ण बदलते. आपल्या मुलीसाठी संजय दत्त लढायला लागतो आणि ट्रेलरच्या शेवटी तर आपल्या मुलीला तो 'कॅरेक्टरलेस' म्हणतो.

हा ट्रेलर सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण करतो. आता हा सिनेमा लोकांना आवडेल की बॉक्स ऑफिसवर आपटेल हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

'मेरी कॉम' सिनेमाचे दिग्दर्शक उमंग कुमार यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 05:10 PM IST

ताज्या बातम्या