सुंदर,सुशील आणि डेंजरस -'अ जेन्टलमन'चा पहिला ट्रेलर रिलीज

नेमाचा ट्रेलर पाहून तरी सिनेमामध्ये हिट होण्यासाठी गरजेच्या साऱ्या गोष्टी आहेत असं वाटतंय. अॅक्शन,रोमान्स,सस्पेन्स, एन्टरटेनमेंट सगळंच.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2017 03:26 PM IST

सुंदर,सुशील आणि डेंजरस -'अ जेन्टलमन'चा पहिला ट्रेलर रिलीज

10जुलै: आज 'अ जेन्टलमन'चा पहिला ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा एकीकडे एका सुंदर सुशील जेन्टलमनच्या भूमिकेत दिसतोय तर दुसरीकडे ऋषी नावाच्या एका खतरनाक पात्राच्या भूमिकेत दिसतोय. एकाच व्यक्तिरेखेच्या दोन वेगळ्या बाजू सिद्धार्थ रंगवतोय.

एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा भासतोय.सुनील शेट्टीसु्द्धा छोट्या पण दमदार भूमिकेत दिसतोय.त्याचं वय 55 वाटतच नाही.

या सिनेमातल्या अनेक दृश्यांनी जर ऋषी कपूरच्या बॉबीची आठवण करून दिली तर नवल वाटायला नको. जॅकलीन फर्नांडिस एका क्यूट प्रेमिकेच्या भूमिकेत दिसतेय. सिनेमाचा ट्रेलर पाहून तरी सिनेमामध्ये हिट होण्यासाठी गरजेच्या साऱ्या गोष्टी आहेत असं वाटतंय. अॅक्शन,रोमान्स,सस्पेन्स, एन्टरटेनमेंट सगळंच.

आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतो की आपटतो हे तो रिलीज झाल्यावर कळेल. हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...