सुशांत-क्रितीची रंगतेय केमिस्ट्री

सुशांत-क्रितीची रंगतेय केमिस्ट्री

  • Share this:

18 एप्रिल : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या राबता सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. पहिल्यांदाच या नवीन जोडीची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खासकरुन तरुण वर्गात उत्साह आहे.

राबता सिनेमाची तुलना बेफिक्रे सिनेमाशी केली जात होती. मात्र दोन्ही सिनेमांत बराच फरक असल्याचं राबताच्या नव्या ट्रेलरने दाखवून दिलंय. सिनेमाच्या रिलीज आधीच ट्रेलरमधील सुशांत आणि क्रितीच्या सिजलिंग केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

यशराजच्या नव्या सिनेमाची तुलना त्याच्या गेल्या वर्षीच्या बेफिक्रे सिनेमाशी करत असल्याने आताचा राबता सिनेमा त्यापेक्षाही सुपरहिट असेल अशी प्रेक्षकांची आशा आहे. राबता सिनेमाचं दिग्दर्शन दिनेश विजन यांनी केलं असून सिनेमाचा फर्स्टलूक सुद्धा रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाच्या फर्स्टलूक मधूनच सुशांत आणि क्रितीमधील केमिस्ट्री झळकली होती.

नियोजन करुनच सिनेमाच्या निर्मात्याने सिनेमाचं फर्स्टलूक सर्वत्र प्रदर्शित केलं असावं. कारण रोमॅँटिक सिनेमा तेव्हाच हिट होतो जेव्हा सिनेमाच्या जोडीचा रियल लाईफमधील रोमान्स प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनतो.

कदाचित म्हणूनच सुशांतने गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या महागड्या कारमधून क्रितीला लॉँग ड्राईव्हला नेल होतं. एवढचं नव्हे तर त्याबद्दलच्या बऱ्याच चर्चासुद्धा रंगात आल्या होत्या. राबता सिनेमा 9 जूनला सर्वत्र रिलीज होईल.

First published: April 18, 2017, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading