मुंबई, 18 मे: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळानं (Tautkae Cyclone) सोमवारी देशातील बर्याच राज्यांना जबरदस्त तडाखा दिला आहे. यामध्ये केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता. या चक्रीवादळामुळं काल मुंबईत बर्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला (Rain in mumbai) आहे. या वादळाचा बॉलिवूड कलाकारांनाही (Bollywood actor) चांगलाचं फटका बसला आहे. या वादळामुळे बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कार्यालयाचंही (Office) मोठं नुकसान झालं आहे.
याबाबतची माहिती अमिताभ बच्चन यांनी स्वतः आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलं की, चक्रीवादळामुळं त्यांच्या कार्यालयाचं प्रचंड नुकसान झालं आहे. कालच्या पावसामुळं कार्यालयात सर्वत्र पाणी भरलं असून कार्यालयाची स्थिती पूरसदृश झाली आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या कार्यालयाचं शेल्टर देखील वादळात उडून गेलं आहे.
बिग बीनं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं की- 'तौत्के वादळामुळं सर्वत्र शांतता पसरली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. सर्वत्र पाणी भरलं आहे. छत पाजरण्याची स्थिती तयार झाली आहे. कार्यालयात देखील पूरसदृश्य स्थिती तयार झाली आहे. अतिवृष्टीमुळं प्लास्टिकचं कव्हरही फाटलं आहे. त्याचबरोबर कर्मचार्यांसाठी तयार करण्यात आलेला निवारा देखील उडून गेला आहे. पण, लढण्याची जिद्द आणखी हरली नाही. वादळामुळे झालेल्या पडझडीचं पुन्हा नव्यानं उभारणी सुरू आहे. आकाशातून पाऊस कोसळत असतानाही काम सुरू आहे.'
हे ही वाचा-
त्यांनी पुढं म्हटलं की, 'खरं सांगायचं झालं तर हा स्टाफ खरात उत्कृष्ट आहे. ते बऱ्याच काळापासून ओल्या कपड्यांत काम करत आहेत. मी त्यांना माझ्या कपाटातून काही कपडे दिले आहेत, जेणेकरुन ते कपडे बदलू शकतील. पण हे कपडे काहींना अत्यंत ढगाळे येत आहेत. तर काहींना खूपच लहान होतं आहेत.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Cyclone