'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस

'Total Dhamaal' Trailer:  अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस

या सिनेमात यावेळी सिंहापासून ते सापापर्यंत आणि सायकलपासून ते हॅलिकॉप्टरपर्यंत सारं काही दिसणार आहे.

  • Share this:

अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी आणि रितेश देशमुख यांच्या आगामी टोटल धमाल सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. धमाल सिनेमाच्या सिरीजमधील हा तिसरा सिनेमा आ. या सिनेमाचं दिग्दर्शनही इंद्र कुमार यांनी केलं आहे. टोटल धमाल सिनेमात यावेळी अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, जॉनी लिव्हर यांसारखे मात्तबर आहेत.

यावेळी धमालची मजा तिप्पट होणार आहे. या सिनेमात यावेळी सिंहापासून ते सापापर्यंत आणि सायकलपासून ते हॅलिकॉप्टरपर्यंत सारं काही दिसणार आहे. विनोदी पटात गणती करण्यात आलेल्या टोटल धमाल सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे.

या सिनेमातही आधीच्या सिनेमाप्रमाणे सर्व कलाकार मंडळी ५० कोटी रुपयांच्या पाठीमागे धावताना दाखवले आहेत. सिनेमात अनिल आणि माधुरी गुजराती जोडपं दाखवण्यात आले आहेत.

तगड्या विनोदी कलाकारांसोबत माकड क्रिस्टलही यात झळकणार आहे. क्रिस्टलने याआधी अनेक हॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. हँगओवर २, जॉर्ज ऑफ द जंगल आणि नाइट अट दी म्युझियम सिनेमात या क्रिस्टलने काम केलं आहे.

सिनेमाशी निगडीत सूत्रांनी सांगितले की, या क्रिस्टलची सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तिच्यामुळे प्रेक्षक पोट धरून हसतील. येत्या २२ फेब्रुवारीला टोटल धमाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading