फ्रायडे फिव्हर : आज 'हे' पाच मराठी, दोन हिंदी सिनेमे होणार रिलीज

फ्रायडे फिव्हर : आज 'हे' पाच मराठी, दोन हिंदी सिनेमे होणार रिलीज

आज शुक्रवार आज एक दोन नाही तर तब्बल 5 मराठी आणि 2 हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत.

  • Share this:

23 फेब्रुवारी : आज शुक्रवार आज एक दोन नाही तर तब्बल 5 मराठी आणि 2 हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. आज रिलीज झालेला पहिला सिनेमा अभिनेत्री सई ताम्हणकर आणि शरद केळकर यांचा 'राक्षस'. ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित या सिनेमात सई आणि शरदची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसेल. 'राक्षस' ही आदिवासी आणि जंगल याभोवती फिरणारी एक गूढकथा आहे. आता 'राक्षस'मध्ये नेमक कोणतं रहस्य दडलंय याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

आज रिलीज झालेला दुसरा सिनेमा आहे प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांचा 'आम्ही दोघी'. हा सिनेमा लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारित असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रतिमा जोशी यांनी केलं आहे. दोन भिन्न वृत्तीच्या महिलांची गोष्ट यात आपल्याला पहायला मिळेल.

आजचा तिसरा सिनेमा आहे लूज कंट्रोल. अजय सिंग दिग्दर्शित या सिनेमात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम, शशीकांत केरकर, मनमीत पेम यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमातून धमाल अडल्ट कॉमेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

याशिवाय फ्रँडशीप बँड आणि अॅट्रॉसिटी हे अजून दोन सिनेमेही रिलीज झालेत. तर हिंदीत 'वेलकम टू न्यूयॉर्क' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' हे सिनेमेही आज रिलीज झालेत.

First published: February 23, 2018, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading