बॉलिवूडचे 'हे' टॉप सेलिब्रेटी आहेत शुद्ध शाकाहारी!

फिटनेसमुळे अनेक सेलिब्रेटींना त्याच्या आवडत्या नॉन व्हेज फुड पासून दूर राहावं लागतं. पण काही सेलिब्रेटी मात्र पूर्णतः शाकाहारी आहेत.

  • Share this:

 बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या फिटनेससाठी खूपच जागरुक असतात. ज्यामुळे अनेकांना त्याच्या आवडत्या नॉन व्हेज फुड पासून दूर राहावं लागतं. पण बॉलिवूडमध्ये काही असेही सेलिब्रेटी आहेत जे पूर्णतः शाकाहारी आहेत.

अभिनेता शाहिद कपूर हा पूर्णतः शाकाहारी आहे. मागच्या अनेक वर्षांपासून त्यानं नॉनव्हेज खाणं बंद केलं आहे. इतकंच नाही तर जेव्हा करिना कपूर त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती त्यावेळी ती सुद्धा त्याच्यासाठी शाकाहारी झाली होती.

मागच्या काही काळापासून रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असेलेली अलिया भट सुद्धा शाकाहारी आहे.

आपल्या पिळदार शरिरयष्टीसाठी प्रसिद्ध असलेला जॉन अब्राहमसुद्धा शाकाहारी आहे. जॉन अनेक तास जिममध्ये वर्कआऊट करतो. तो शाकाहारी आणि हेल्दी लाइफस्टाइल जगणं पसंद करतो. जॉन अब्राहमचं गाड्यांप्रमाणेच प्राण्यांवरही अतोनात प्रेम आहे.

सध्या चर्चेत असलेल्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेली कंगना राणावतसुद्धा शाकाहारी आहे. तिनेदेखील दूध आणि त्यापासून बनलेले पदार्थ खाणं बंद केलं आहे. खरंतर तिला दूधापासून बनवलेल्या पदार्थांची अॅलर्जी आहे. त्यामुळे तिनं हे पदार्थ खाणं बंद केलं.

सोनम कपूरला बॉलीवूडमध्ये ‘फॅशन क्वीन’ म्हणून ओळखलं जातं. सोनमने घटवलेलं वजन तर सर्वांनाच माहिती आहे. आता ती फॅशन क्वीनसह हेल्दी लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. सोनमने पाच वर्षांपूर्वी मांसाहार बंद करुन शाकाहारी पदार्थ खाण्यास सुरुवात केली होती. तिने दूध आणि दुग्धजन्य पदार्थही खाणं बंद केलं आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघंही शाकाहारी आहेत. विराटनं शाकाहारी झाल्यानंतर त्याचा फिटनेस ग्राफ उंचावल्याचं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

First published: November 16, 2019, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading