नेहा-आदित्यच्या लग्नाची तयारी सुरू, भाऊ टोनी कक्करनं शेअर केला VIDEO

नेहा-आदित्यच्या लग्नाची तयारी सुरू, भाऊ टोनी कक्करनं शेअर केला VIDEO

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण येत्या 14 फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सध्या खूप चर्चेत आहे. मागच्या काही काळापासून नेहा आदित्य नारायणसोबत लग्न करणार असल्यच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांचे कुटुंबीय इंडियन आयडॉलच्या मंचावर भेटले होते. त्यानंतर या दोघांचे प्रीवेडिंग फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता नेहा आणि आदित्य गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं बोललं जात आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून याचा एक व्हिडीओ नेहाचा भाऊ टोनी कक्करनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण येत्या 14 फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता या दोघांचे गोव्यातील बीचवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे हे दोघं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार का अशी चर्चा सुरू झाली. पण आता नेहाचा भाऊ टोनीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात नेहा आणि आदित्य सुद्धा दिसत आहे.

बॉयफ्रेंड असावा तर असा! सारासाठी कार्तिक झाला बॉडीगार्ड, पाहा VIDEO

टोनी कक्करनं शेअर केलेला हा व्हिडीओ त्यांच्या लग्नाच्या तयारीचा नाही तर नेहा आणि आदित्यच्या आगामी अल्बम साँगच्या प्रमोशनचा व्हिडीओ आहे. त्यांचं हे गाणं येत्या 10 फेब्रुवारीला रिलीज होतं आहे. हे गाणं नेहाचा भाऊ टोनी कक्करनं कंपोज केलं आहे. या गाण्याचं शूट गोव्यात झालं असून याचे फोटो नेहा आणि आदित्य यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी नवभारत टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उदित नारायण यांना नेहा आणि आदित्यच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना उदित नारायण म्हणाले, ‘नेहा खूपच गोड मुलगी आहे. मला ती आवडते आणि तिनं तिच्या करिअरमध्ये खूप नावही कमावलं आहे. विशेष म्हणजे नेहा आणि आदित्यची जोडी चांगली जमतेय. मला बाकी काही माहित नाही पण जर नेहा आमच्या घरची सून झाली तर मला खूप आवडेल. आमच्या घरात एक फिमेल सिंगर सहभागी होईल.’

VIDEO : नोरा फतेही आणि रेमो डिसूझामध्ये अवॉर्डसाठी झटापट, अभिनेत्रीला कोसळलं रडू

इंडियन आयडॉलच्या होस्टिंग दरम्यान आदित्य नेहमीच नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे हे वृत्त कितपत खरं आहे याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे नेहा कक्कर तिच्या लग्नाच्या वृत्तावर काय प्रतिक्रिया देते याची सर्वांना उत्सुकता आहे. कारण वर्षभरापूर्वी नेहाचा ब्रेकअप झाला असून त्यावेळी ती डिप्रेशनची शिकार झाली होती. मात्र आता ती यातून बाहेर पडली आहे.

राहुल खन्नाच्या BOLD फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, मलायकानं केली ‘ही’ कमेंट

First published: February 7, 2020, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading