MISS WORLD 2019 : टोनी सिंगने पटकावला मिस वर्ल्डचा मुकुट

MISS WORLD 2019 : टोनी सिंगने पटकावला मिस वर्ल्डचा मुकुट

टोनी एन सिंगने मिस वर्ल्डचा मुकुट 120 देशांमधील स्पर्धकांना मागे टाकून जिंकला तर भारताची सुमन राव तिसऱ्या स्थानावर राहिली.

  • Share this:

लंडन, 15 डिसेंबर : मिस यूनिव्हर्स 2019 नंतर शनिवारी रात्री उशिरा मिस वर्ल्ड 2019 ची घोषणा करण्यात आली. लंडनमध्ये झालेल्या सोहळ्यात जमैकाच्या टोनी एन सिंग हीने मिस वर्ल्ड 2019 चा मुकुट पटकावला. यामध्ये फ्रान्सची ओफिली मेजिनो उपविजेती ठरली तर भारताची सुमन राव तिसऱ्या स्थानावार राहिली.

टोनी एन सिंगने मिस वर्ल्डचा मुकुट 120 देशांमधील स्पर्धकांना मागे टाकून जिंकला आहे. तिसऱ्या स्थानावर राहिलेली सुमन राव राजस्थानची असून 2019 चा मिस इंडियाचा किताब तिने जिंकलं होता.

याआधी अटलांटा इथं झालेल्या 2019 च्या मिस यूनिव्हर्समध्ये साऊथ आफ्रिकेच्या सौदर्यवतीने बाजी मारली होती. जोजिबिनी तुंजीने जगभरातील 90 सौंदर्यवतींना टक्कर देत मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता.

मिस मैक्सिको आणि जोजिबिनी यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. सौंदर्यवती मैक्सिकोला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यामध्ये साउथ अफ्रिका, मेक्सिको, कोलंबिया, थायलंड, प्‍यूरटोरिको या देशांमधील सौंदर्यवती पहिल्या 5 मध्ये होत्या. तर पहिल्या दहामध्ये येण्याचा मान भारतातील सौंदर्यवती वर्तिका सिंहने पटकावला होता. 2018 रोजी मिस युनिवर्सचा किताब पटकवलेल्य़ा कॅटोरिना ग्रेने जोजिबिनी तुंजीला मुकूट घातला.

Published by: Suraj Yadav
First published: December 15, 2019, 7:25 AM IST
Tags: miss world

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading