मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Spider Man: No Way Home'च्या ट्रेलरनं जिंकली प्रेक्षकांची मनं, चाहत्यांना प्रतीक्षा सिनेमाची

'Spider Man: No Way Home'च्या ट्रेलरनं जिंकली प्रेक्षकांची मनं, चाहत्यांना प्रतीक्षा सिनेमाची

सोनी स्टुडीओकडून ‘स्पायडर मॅन : नो व्हे होम’चा (Spider Man : No way Home) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सोनी स्टुडीओकडून ‘स्पायडर मॅन : नो व्हे होम’चा (Spider Man : No way Home) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सोनी स्टुडीओकडून ‘स्पायडर मॅन : नो व्हे होम’चा (Spider Man : No way Home) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुंबई 24 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर एका ट्रेलरची मोठी चर्चा आहे. बहूप्रतिक्षित आणि बहूचर्चित ‘स्पायडर मॅन : नो व्हे होम’चा (Spider Man : No Way Home) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रविवारीच सोशल मीडियावर एक ट्रेलर व्हायरल झाला होता. तर हा टॉम हॉलंड (Tom Holland) यांचा ‘स्पायडर मॅन : नो व्हे होम’चा ट्रेलर आहे असा दावा केला जात होता. मात्र स्पायडर मॅनच्या ऑफिशियल हॅन्डलवरून हा ट्रेलर प्रदर्शित झाला नव्हता.

काही वेळानंतरच हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्यात आला. सोनी स्टुडिओने हा व्हिडीओ हटवला. तसेच सोनी स्टुडीओकडून अनेक पोस्ट्स आणि शेअर देखील ब्लॉक करण्यात आल्या. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच लीक झाला होता. त्यामुळे आधीच या ट्रेलरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सगळ्या पोस्ट काढण्यात आल्यानंतर सोनी स्टुडीओकडून अधिकृतरित्या ‘स्पायडर मॅन : नो व्हे होम’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहात होते. काहीच मिनिटांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ट्विटरवरही ट्रेंडींवर आहे. दिग्दर्शक जॉन वॅट्स यांचा हा बिग प्रोजेक्ट मानला जातो. चित्रपटात टॉम हॉलंड (Tom Holland), झेंदया (Zendaya), बेनेडिक्ट (Benedict Cumberbatch) हे कलाकार आहेत.

नशे सी चड गई..' आईच्या बर्थडे पार्टीत रणवीरचा दीपिकासोबत बेधुंद डान्स; VIDEO Viral

स्टिव्ह डिट्को, स्टॅन ली, क्रिस केना यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. मार्व्हेल कॉमिकवर ही कथा आधारीत आहे. 17 डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Hollywood