S M L

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन

त्यांना त्वचेचा कर्क रोग झाल्याचे कळले होते. या रोगाशी अनेक दिवस ते झुंज देत होते. काल रात्री त्यांनी अखेर य जगाचा निरोप घेतला.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 30, 2017 10:33 AM IST

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन

मुंबई, 30 सप्टेंबर: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी  अंतिम श्वास घेतला आहे.मृत्यूसमयी  ते ६७ वर्षांचे होते.

टॉम यांना काही दिवसांपासून अंगदुखीच्या त्रास होत होता. त्यामुळे  त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना त्वचेचा कर्क रोग झाल्याचं  कळलं होतं. या रोगाशी अनेक दिवस ते झुंज देत होते. काल रात्री त्यांनी अखेर या जगाचा निरोप घेतला.

अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते टॉम अल्टर यांनी १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चरस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये  एन्ट्री  केली. त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘क्रांती’, ‘बोस : द अनफरगॉटन हिरो’ आणि ‘वीर झारा’ या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या. त्यांनी  ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसंच, अनेक  छोट्या पडद्यावरील मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र, ‘जबान संभालके’ (१९९३-१९९७) या शो (सिटकॉम) नंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवरील ‘जुनून’ या मालिकेत त्यांनी साकारलेली गँगस्टर केशव कलसीची भूमिका खूप गाजली होती. तसंच ‘जुगलबंदी’, ‘भारत एक खोज’, ‘घुटन’, ‘शक्तीमान’, ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘यहाँ के हम सिकंदर’ यासारख्या मालिकांमधूनही त्यांनी आपल्या  अभिनयाची छाप पाडली.अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शनही केले होते. तर १९८० ते १९९० या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिताही केली. त्यादरम्यान क्रिकेट विश्वात पाऊल ठेवण्यास सज्ज असणाऱ्या सचिन तेंडुलकरची टीव्हीवर मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते. कला आणि चित्रपट विश्वात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी २००८ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 10:25 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close