'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार

'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार

पहिले तीन दिवस मिळून एकूण 51.45 कोटी इतकी कमाई केली.

  • Share this:

14 ऑगस्ट : अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत असलेल्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 50 कोटींचा आकडा पार केलाय. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई वाढली आहे.

रणबीर कपूरच्या जग्गा जासूस आणि शाहरूखच्या जब हॅरी मेट सेजलने बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. पण या दोन्ही सिनेमांनतर रिलीज झालेला टॉयलेट एक प्रेम कथा मात्र बॉक्स ऑफिसवर चांगला जम बसवेल असं दिसतंय. 'टॉयलेट...'ने पहिल्या दिवशी 13.10 कोटी कमवले तर दुसऱ्या दिवशी 17.10 कोटीची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 21.25 कोटी इतकी कमाई केली. पहिले तीन दिवस मिळून एकूण 51.45 कोटी इतकी कमाई केली.

समीक्षकांच्या मते या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरूवात केली आहे. आता हा सिनेमा 100 कोटीचा आकडा कधी पार करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 03:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading