आजच्या महाएपिसोडमध्ये राणादा जिंकणार कुस्ती पण...

आजच्या महाएपिसोडमध्ये राणादा जिंकणार कुस्ती पण...

आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच घटना घडणार आहेत. राणाला कुस्ती जिंकण्यासाठी मागे लागणारे बलसारा आज त्याला कुस्ती हरायला सांगतात.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : सध्या तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणादा आणि पाठकबाई यांच्यात दुरावा निर्माण झालाय. त्याला कारणही सखी आहे. सखीनं अंजलीला सांगितलं, तू राणाच्या कुस्तीच्या मध्ये अडथळा बनू नकोस. म्हणून अंजली माहेरी जाते.


आज ( 25 नोव्हेंबर ) तुझ्यात जीव रंगलाचा दोन तासांचा महाएपिसोड आहे. त्यात राणाची मॅटवरची फायनल कुस्ती आहे. अंजलीनं त्या कुस्तीसाठी यावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण अंजलीचा राग काही अजून गेलेला नाही. ती माहेरीच आहे.


आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच घटना घडणार आहेत. राणाला कुस्ती जिंकण्यासाठी मागे लागणारे बलसारा आज त्याला कुस्ती हरायला सांगतात. त्यासाठी त्याला दुप्पट पैसे मिळणार असतात. सखीला ही चाल कळते.


आजच्या एपिसोडमध्ये राणादा कुस्ती जिंकतो. जसा तो कुस्ती जिंकतो, तशी अंजलीही तिथे येते. गैरसमज दूर होतात. आजचा एपिसोड रंगणार आहे.


राणा आणि त्याची ट्रेनर सखी यांचीही चांगली मैत्री झालीय. गावच्या तांबड्या मातीत कुस्ती खेळणारा राणादा. त्यानं भल्या भल्यांना हरवलंय. पण आता मॅटवरची कुस्ती खेळण्याचं आव्हान त्यानं स्वीकारलंय. आपल्या सखीच्या मदतीनं तो मॅटवरची प्रॅक्टिस जीव तोडून केली होती.


जिच्यासोबत राणा बोलायला पण लाजत होता त्या सखीसोबत राणाने आता चक्क मैत्री केली आहे. त्यांच्यात झालेल्या दोस्तीच्या कॉन्ट्रॅक्टनुसार राणा आता सखीशी मित्र म्हणून वागत आहे.


ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. मॅटवरची कुस्ती तो जिंकतो कशी ते आता पाहायचं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2018 05:40 PM IST

ताज्या बातम्या