बाॅक्स आॅफिसवर 'ट्युबलाईट' पेटली, सलमानच्या फॅन्सना ट्रीट

बाॅक्स आॅफिसवर 'ट्युबलाईट' पेटली, सलमानच्या फॅन्सना ट्रीट

सलमान खानचा ट्युबलाईट हा बहुचर्चित सिनेमा आज प्रदर्शित झालाय. सल्लूभाईने चाहत्यांना दिलीय ईदची खास भेट.

  • Share this:

23 जून : आजचा फ्रायडे आहे खास. कारण आज बॉक्सऑफीस उजळून निघणारे असंच म्हणावं लागेल, कारण सलमान खानचा ट्युबलाईट हा बहुचर्चित सिनेमा आज प्रदर्शित झालाय. सल्लूभाईने चाहत्यांना दिलीय ईदची खास भेट.

1962च्या इंडो-चायना युद्धाचा बॅकड्रॉप असलेला हा सिनेमा लिटिल बॉय या हॉलिवूडपटावरून प्रेरित आहे. सलमान खान आणि सोहेल खान ही खऱ्या आयुष्यातील भावांची जोडी पडद्यावरही भावांच्या भूमिकेत दिसेल. तर यात चिनी अभिनेत्री झुझूदेखील खास भूमिकेत आहे. ट्युबलाईटच्या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांवर मोहिनी घातलेय,रेडिओ साँग आणि नाच मेरी जान या गाण्यांवर प्रेक्षकांनी आधीच ताल धरायला सुरुवात केलीय.

सलमान खानची यातील भूमिकाही स्पेशल आहे,त्यामुळे एकंदर उत्सुकता नक्कीच वाढलेय.पहिल्याच दिवशी ट्युबलाईट बॉक्सऑफीसवर कितीचा गल्ला कमावणार हे आम्ही तुम्हाला सांगत राहूच. एकंदर सलमान खानचा सिनेमा म्हणजे फ्रायडेची मोठीच मेजवानी आज प्रेक्षकांना मिळणार यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading