मोहम्मद रफींचा आज 93वा जन्मदिन, गुगलनं केलं डूडल

मोहम्मद रफींचा आज 93वा जन्मदिन, गुगलनं केलं डूडल

सुरांचे बादशहा मोहम्मद रफी यांचा आज 93वा जन्मदिन. त्यानिमित्तानं गुगलनं त्यांचं डुडल केलंय.त्यात रफी साहेब माईकवर गातायत, दुसऱ्या बाजूला एक जण गिटार वाजवतोय. आणि हिरो हिराॅइन्स आहेत.

  • Share this:

24 डिसेंबर : सुरांचे बादशहा मोहम्मद रफी यांचा आज 93वा जन्मदिन. त्यानिमित्तानं गुगलनं त्यांचं डुडल केलंय.त्यात रफी साहेब माईकवर गातायत, दुसऱ्या बाजूला एक जण गिटार वाजवतोय. आणि हिरो हिराॅइन्स आहेत.

आवाजाच्या या जादूगाराची असंख्य गाणी आपली साथसोबत करतात. रफी साहेबांनी स्टेजवर पहिला परफाॅर्मन्स 13व्या वर्षी केला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या श्याम सुंदरना रफी यांचा आवाज आवडला. त्यांनी त्यांना मुंबईत बोलावले. रफींनी पहिलं गाणं गायलं ते पंजाबी. 1944मध्ये नौशाद यांनी हिंदुस्थान के  हम है सिनेमात रफींचा आवाज घेतला.

रफी साहेबांनी पहिलं हिट गाणं दिलं ते 1949मध्ये दुलारी सिनेमातलं  सुहानी रात ढल चुकी. याचं संगीतही नौशाद यांनी दिलंय. रफींच्या अजरामर स्वरांनी त्यांची आठवण कायमच रसिकांसोबत असते.

First published: December 24, 2017, 11:25 AM IST

ताज्या बातम्या