Home /News /entertainment /

मिलिंद गवळी वाढदिवशी मिस करतायत आईला, भावुक पोस्ट लिहित आठवणींना दिला उजाळा

मिलिंद गवळी वाढदिवशी मिस करतायत आईला, भावुक पोस्ट लिहित आठवणींना दिला उजाळा

आज मिलिंद गवळी यांचा वाढदिवस आहे.या दिवशी ते त्यांच्या आईला खूप मिस करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

    मुंबई, 16 जून- आई कुठे काय करते  ( Aai Kuthe Kay Karte)   ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसतात. मिलिंद गवळी या भूमिकेला अभिनयाच्या कौशल्याने एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले आहेत. भूमिका जरी नकारत्मक असली तरी त्यांची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. आज मिलिंद गवळी यांचा वाढदिवस आहे. मालिकेच्या सेटवर तर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाच आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर ( Actor Milind Gawali Birthday)  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या दिवशी मिलिंद गवळी यांना त्यांच्या आईची आठवण सतावत आहे. या दिवशी ते त्यांच्या आईला खूप मिस करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. मिलिंद गवळी यांनी त्यांच्या आईचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,“ आई ““माझी माय “  सुशीला धोंडीराम निमसे लग्नानंतर सुशिला श्रीराम गवळी...लग्नाच्या तीन वर्षानंतर मिलिंदची आई ,तिला छान वाटायचे मिलिंद ची आई ऐकायला , धुळ्याला होती मग नाशिकला आली , आजोबा कामानिमित्त बरेच वेळा मुंबईला यायचे ,तिची खूप इच्छा होती मुंबई बघायची , पण आजोबा कधी तिला मुंबईला घेऊन आले नाहीत. वाचा-मराठीतील लोकप्रिय संगीतकारानं घेतली ड्रीम बाइक, किंमत ऐकून डोक्याला लावाल हात! पण मुंबई हे तिचं स्वप्न होतं ,पाचवीपर्यंत शिक्षण झालं आठ भावंड म्हणून आईला वयाच्या सातव्या वर्षापासून स्वयंपाकात घर कामात मदत करायला सुरुवात केली ,अगदी लहान वयातच सुगरण झाली ,इतकी सुगरण की कोणीही तिच्या हातचं खाल्लं की जन्मात विसरायचा नाही ,एकदा तर रत्नाकर मतकरीं साठी आईने पुरणपोळ्या केल्या होत्या त्यांना इतक्या आवडल्या की त्यांनी त्या पुरण पोळ्यां विषयी लिहिलं होतं, कठीण कठीण पदार्थ ती अगदी सहज करायची , अनारसे लाडू ,पन्नास पन्नास पोळ्या तर ती सहज लाटायची हसत-खेळत. वाचा-निर्मात्याने अखेर सांगूनच टाकलं कधी होणार 'तारक मेहता'मध्ये दयाबेनची एंट्री तिला कळलं होतं की माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातं जातो, पोटभर चविष्ट खाल्लं की माणसाचं मन भरतं आणि एकदा का मन भरलं की त्या अन्नाची चव जन्मभर हृदयातंन जात नाही ,आता आई नाहीये पण तिच्या हातच्या अन्नाची चव ही अनेकांच्या जिभेवर अजूनही ताजी ताजी आहे ,वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीराम गवळी यांचं स्थळ आलं सब इंस्पेक्टर ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि पोस्टिंग मुंबईत मिळालेलं आता आयुष्यात कधीही मुंबई सोडून जायचं नाही हे तिने मनात निश्चय केला.
    हे आयुष्य कसं जगावं हे तिला कळलं होतं फक्त निस्वार्थ प्रेम भेदभाव न करता जगावर करावं जगण्यावर करावं सगळे सण ती मनापासून साजरी करायची नवरात्रीतले नऊ दिवस उपास दिवाळी साजरी करावी तर तिनेच शेजारच्या खान बहीण बरोबर ईद सुद्धा साजरी करायची खाली राहणाऱ्या क्रिश्चन कुटुंबाबरोबर क्रिसमस सुद्धा साजरी करायची , रंगपंचमी हा तिचा आवडता सण कुठल्याही धर्माचा विचार न करता बिनधास्तपणे त्यांनासुद्धा ती रंग लावायची. आज खूपच आठवण आली म्हणून थोडसं तिच्याविषयी लिहावसं वाटलं वंदे मातरम..
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या