Birthday Special : मी मस्तीभरं आयुष्य जगत नाही - सुबोध भावे

सुबोध भावेचा आज वाढदिवस. दिवाळीत त्यानं ' आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर'ची चांगली ट्रीट प्रेक्षकांना दिलीय.

  • Share this:

आज अभिनेता सुबोध भावेचा वाढदिवस. कालच 'आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' रिलीज झालाय. सुबोधनं त्याच्या वाढदिवसाची चांगली ट्रिट प्रेक्षकांना दिलीय.

हे वर्ष सुबोधसाठी एकदम 'कडक' गेलं. त्याची निर्मिती असलेला पुष्पक विमान रिलीज झाला. त्यानंतर सविता दामोदर परांजपे,शुभ लग्न सावधान, माझा अगडबम असे एकापाठोपाठ सिनेमांनी त्याचा चाहता वर्ग खूश झाला.

अभिनयाच्या वैविध्यानं सुबोध नेहमीच रसिकांच्या मनावर राज्य करतो. सुबोधच्या आयुष्यात योगायोगही खूप आहेत.

काही वर्षांपूर्वी सुबोध भावेनं झी टाॅकीजसाठी एक फोटो शूट केलं होतं. झी टाॅकीजनं ज्येष्ठ कलाकारांना मानवंदना देण्यासाठी ते शूट केलं होतं . आणि त्यात सुबोध बनला होता काशिनाथ घाणेकर. आता इतक्या वर्षांनी तीच भूमिका त्याच्या वाट्याला आलीय.

'तुला पाहते रे'ची नायिका गायत्री म्हणजेच ईशा सेटवर आली होती. तिनं सुबोधला त्याच्या बरोबर काम करायची इच्छा व्यक्त केली होती. आणि आज ती त्याची नायिका आहे.

आज 'आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरतोय.सुबोध या सिनेमाबद्दल म्हणतो, 'काशिनाथ घाणेकर साकारणं सोपं नव्हतं. माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत.बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. पण इथे असं काहीच नव्हतं.' सुबोध म्हणतो, 'बघ ना, नुसत्या त्यांच्या नावावर नाटक हाऊसफुल होत होतं. मला असा अनुभव कधीच आलेला नाही.'

सुबोध सध्या खूपच बिझी आहे. मग तो त्याच्या फिटनेससाठी काय करतोय? 'मी मस्तीभरं आयुष्य जगत नाही. जागरणं टाळतो. चांगली झोप घेतो. चालायला जातो. बाहेरचं जेवण कमी खातो. शक्यतो सेटवर घरचा डबा नेतो.'

निर्माता आणि कलाकार, सुबोधला कुठली भूमिका जास्त आवडते? यावर तो सांगतो, ' माध्यमाशी जोडणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग कुठलीही भूमिका असो.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2018 10:27 AM IST

ताज्या बातम्या