बर्थडे स्पेशल - 'मस्त मस्त गर्ल' रवीना टंडन

बर्थडे स्पेशल - 'मस्त मस्त गर्ल' रवीना टंडन

1991मध्ये 'पत्थर के फूल' या सिनेमातून रवीनाने सिनेसृष्टीत प्रदार्पण केलं. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 1994च्या 'मोहरा' या सिनेमातून.

  • Share this:

26 आॅक्टोबर : 90वं दशक सुरू झालं होतं. बॉलिवूडचा संपूर्ण चेहरा बदलत होता. नवीन कलाकारांची एंट्री होत होती आणि त्यात जुने कलाकार स्वत:ला टिकवण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्यात एका अशा नवीन चेहऱ्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि सगळ्यांचंच ह्दय जिंकून घेतलं. तो चेहरा आहे 'मस्त मस्त गर्ल' रवीना टंडन' हिचा. तिचा आज 43वा वाढदिवस.

1991मध्ये 'पत्थर के फूल' या सिनेमातून रवीनाने सिनेसृष्टीत प्रदार्पण केलं. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 1994च्या 'मोहरा' या सिनेमातून.

या सिनेमातील अक्षय कुमार आणि रवीना टंडनचं 'तू चीज बडी हे मस्त' हे गाण आपल्याला सगळ्यांनाच त्यांच्या प्रेमात पाडून गेलं. याच गाण्यामुळे रवीनाला 'मस्त मस्त गर्ल' ही पदवी देण्यात आली होती.

याच सिनेमामुळे रवीना आणि अक्षयची जवळीक वाढली. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र गाजत होत्या. त्याच दरम्यान एका प्रसिद्ध मासिकाच्या मुलाखतीत रवीनाने सांगितलं की मोहरा सिनेमाच्या शूटिंगनंतर ती आणि अक्षय लग्न करणार आहेत. पण त्यांचं हे नात जास्त काळ टिकू शकलं नाही. यानंतर रवीना आणि सनी देओलच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. पण असं म्हणतात की सनी आणि रवीनाच्या वाढत्या संबंधामुळे अक्षय, रवीना यांचं नात तुटलं.

ते काहीही असलं तरी नंतर रवीना एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. एखाद्या मोठ्या अभिनेत्रीने बाळाला दत्तक घेणं खूप कठीण असतं. पण रवीनाने दोन मुलींना म्हणजेच छाया आणि पूजाला दत्तक घेतलं

सध्या रवीना सिनेमांपासून दूर आहे. पण अनेक पार्ट्यांमध्ये किंवा टीव्ही शोमध्ये आपण सगळ्यांनीच तिला पाहिलं आहे. रवीना सध्या तिचा नवरा अनिल थडानीसोबत मुंबईत राहते. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला खूप खूप शुभेच्छा.

First published: October 26, 2017, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading