S M L

बाॅलिवूडची 'बाप'माणसं!

सरोगसीद्वारे मुलांचं पालकत्व मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आणि बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सनी या मार्गाद्वारे मुलांचं पालकत्व स्वीकारलं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 03:50 PM IST

बाॅलिवूडची 'बाप'माणसं!

विराज मुळे, 18 जून : सरोगसीद्वारे मुलांचं पालकत्व मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आणि बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सनी या मार्गाद्वारे मुलांचं पालकत्व स्वीकारलं. आपल्या मुलांवर असंच जीवापाड प्रेम करणाऱ्या स्टार्सवर एक नजर टाकुयात.

सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती करून घेण्यात आमिर खान आणि किरण राव यांचं नाव सगळ्यात पुढे आहे. किरणला प्रेग्नन्सीत त्रास होणार हे माहीत झाल्यानंतर आमिरने सरोगसी करून घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या घरात लहानग्या आझादचं आगमन झालं.आज आमिर आझादचा बेस्ट पापा बनण्यासाठी शक्य ते सारं करताना दिसतो.

आमिरप्रमाणेच शाहरूख आणि गौरीनेही दोन मुलं असूनही आपल्यातला वाढलेला दुरावा दूर करण्यासाठी सरोगसी करण्याचा निर्णय घेतला आणि मन्नतवर अबराम या नव्या मेंबरचं आगमन झालं. आज शाहरूख कितीही व्यस्त असला तरीही आबरामसाठी वेळ काढतो आणि त्याचे फोटोज आणि बाललीला सोशल मीडियावरून शेअरही करतो.धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा करण जोहरने लग्न तर केलं नाही. पण मुलांची कमतरता भासू नये यासाठी सरोगसी करून दोन मुलांचं पालकत्व स्वीकारलं. अजून करणने त्यांना फारसं मीडियासमोर आणलेलं नाही.मात्र आपला भलामोठा पसारा सांभाळत असताना करण आता मात्र एका जबाबदार पालकासारखं वागतो. आणि शक्य तेवढा वेळ या दोघांनाच देण्याचा प्रयत्नही करतो..या दोन अनमोल रतनांच्या आगमनामुळे यंदा पहिल्यांदाच करणला फादर्स डे साजरा करायचं निमित्त मिळालंय.

हाच मार्ग कपूर खानदानाचा चिराग तुषार कपूरनेही स्वीकारलाय. त्यानेही सरोगसीद्वारे एका मुलाचं पालकत्व स्वीकारलं. तुषारने या मुलाचं लक्ष्य असं नाव ठेवलंय. सध्या तुषारने आपलं सगळा वेळ लक्ष्यच्या संगोपनात खर्च करतो.त्यामुळेच हल्ली फिल्मी पार्ट्यांपासूनही तो काहीसा दूर असतो.फादर्स डे ही तुषार लक्ष्यसोबतच घालवेल.

Loading...
Loading...

सुश्मिता सेनने मात्र दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांची जबाबदारी स्वीकारली.आज ती या दोन्ही मुलींना मोठया लाडाकोडाने वाढवते. तर कोरिओग्राफर संदीप सोपारकरनेही एका मुलाला दत्तक घेऊन त्याला वाढवण्याचा निर्णय घेतला. संदीपही आपली ही जबाबदारी आज अगदी आनंदाने पार पाडतोय.

याशिवाय गेल्या वर्षभरात करिना आणि सैफचा तैमूर, शाहिद आणि मीराची मीशा असे काही नवे मेंबर्सही बॉलिवूडमध्ये दाखल झालेत आणि आपल्या स्टार आईवडिलांसोबत फिरताना त्यांनीही एव्हाना पेज थ्रीवर आपली हजेरी लावलीय.

हे सगळे स्टार्स कितीही मोठे असले तरी प्रसंगी आई आणि वडील दोन्ही बनून आपल्या मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.आज फादर्स डेच्या  दिवशीही त्यांनी आपल्या या काळजाच्या तुकड्यांसाठी काही ना काही स्पेशल प्लॅन नक्कीच केला असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 03:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close