बर्थडे स्पेशल - अभिनय आणि डायलॉगचे बादशहा 'नाना'

बर्थडे स्पेशल - अभिनय आणि डायलॉगचे बादशहा 'नाना'

'डायलॉग' म्हटलं तर ते त्यात बादशहा आहेत. 'अभिनय' म्हटला तर ते त्यात अव्वल आहेत. आणि 'समाजकार्य' म्हटलं तर तो त्यांचा स्वभाव आहे.

  • Share this:

01 जानेवारी : 'डायलॉग' म्हटलं तर ते त्यात बादशहा आहेत. 'अभिनय' म्हटला तर ते त्यात अव्वल आहेत. आणि 'समाजकार्य' म्हटलं तर तो त्यांचा स्वभाव आहे. हो आम्ही नाना पाटेकरांबद्दलच बोलतोय. आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नाना पाटेकरांचा वाढदिवस आहे.

नानांचा डायलॉग ओळखण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना त्यांचा आवाजच पुरेसा असतो. असे नाना 1 जानेवारी 1951ला रायगडच्या मुरुड जंजिरा गावात जन्मले. नानांची चर्चा फक्त सिनेसृष्टीतच नाही तर समाज प्रबोधनासारख्या क्षेत्रातही आहे. नुकतंच त्यांचा 'आपला मानुस' या मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं. या पोस्टरमधे नाना बुलेटवर बसले आहेत. सिनेमाच्या या हटके पोस्टरमुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

नानांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मुजफ्फर अली यांच्या 'गगन' या सिनेमातून आपल्या सिनेप्रवासाला सुरुवात केली होती. एन चंद्रा यांचा 'अंकुश' आणि विनोद चोप्रा यांचा 'परिंदा' या सिनेमांतून नानांचा अभिनय जगासमोर आला. 1991मध्ये 'क्रांतिवीर' हा त्यांचा सिनेमा सुपरहिट झाला. त्यांनी 'प्रहार'सारख्या सिनेमांचं दिग्दर्शनही केलं. याचबरोबर 'खामोशी', 'यशवंत', 'अब तक छप्पन', 'अपहरण', 'राजनिती' त्याचबरोबर मराठी सिनेमा 'नटसम्राट' आणि 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' अशा सिनेमांमधून नानांनी त्यांच्या अजरामर भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनावर उमटवल्या आहेत. नानांचे प्रत्येक सिनेमातले प्रत्येक डायलॉग्स आजही गाजतात.

बरं मंडळी नाना पाटेकर हे फक्त उत्तम अभिनेतेच नाही तर ते उत्तम खवय्येसुद्धा आहे. एका मुलाखतीत नानांनी सांगितलं होतं की, 'ते नेहमी त्यांच्या मित्रांना घरी बोलावून त्यांना आपल्या हाताची चव चाखवतात'.

खरं तर नाना खूप आलिशान आयुष्य जगू शकतात पण त्यांना नेहमी साधं रहायला आवडतं. गरजूंना मदत करण्यात ते नेहमी पुढे असतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी नानांनी 'नाम फाउंडेशन'सारखी चळवळच केली. ते चालवत असलेल्या चळवळीचा शेतकऱ्यांना, नदी संरक्षणासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे एक 'चांगला मानूस' म्हणून आपली ओळख बनवणाऱ्या नाना पाटेकरांना न्यूज 18 लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा!

First published: January 1, 2018, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading