Elec-widget

आज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...

आज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...

'तुला पाहते रे' या मालिकेत विक्रांत आणि ईशा व्यतिरिक्त या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेत दिसणारी मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हीदेखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : आजकाल मालिकांमध्ये नायिकेइतकंच महत्त्व खलनायिकांना प्राप्त झालंय. खलनायिकेला देखील तितकीच लोकप्रियता मिळतेय. 'तुला पाहते रे' या मालिकेत विक्रांत आणि ईशा व्यतिरिक्त या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेत दिसणारी मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हीदेखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. मायरा आणि झेंडे यांना ईशा आवडत नसून तिला खाली खेचण्यासाठी ते दोघेही अतोनात प्रयत्न करत आहे पण त्यांना त्यात यश नाही मिळत.


नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की मायरा आणि झेंडे इशाला सरंजामे इंडस्ट्रीजमधून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर फ्रॉड केल्याचा आळ आणतात आणि तिला टर्मिनेशन लेटर देतात. ईशाला तिची बाजू मांडण्याची एकही संधी दिली जात नाही. पण ईशाला ऑफिसमधून बाहेर काढणार इतक्यातच विक्रांत ऑफिसमध्ये येतो. झालेला सर्व प्रकार जाणून घेऊन विक्रांत स्वतः ईशाची उलट तपासणी करायचा निर्णय घेतो आणि त्या उलट तपासणीमध्ये त्याला आढळून येतं की या फ्रॉडच्या मागे इशा नसून मायरा आहे.


आता विक्रांत तिला जाब तर विचारणारच आहे पण इतकी एफिशिएंट एम्प्लॉयी असलेली मायरा असं काही करेल असं विक्रांतला वाटलं नव्हतं आणि म्हणूनच विक्रांत तिला कामावरून काढून टाकणार की तिला तिची चूक सुधारायची अजून एक संधी देणार हे पाहणं रंजक ठरेल. ईशा ही प्रेमळ असल्यानं ती मायराला क्षमा करणार. मायराला पुन्हा एकदा संधी मिळणार.

Loading...


'तुला पाहते रे' ही मालिका कधी नंबर वन तर कधी नंबर टुवर असते. सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांच पसंत पडत आहे.


विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे.


#TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...