Birthday Special : वयाच्या 12 व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'ही' अभिनेत्री

Birthday Special : वयाच्या 12 व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'ही' अभिनेत्री

70-80 च्या दशकात अनेक अभिनेत्री दिलीप कुमार यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असत. या काळात त्यांचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : हिंदी सिनेसृष्टीनं अनेक दमदार अभिनेत्यांना जन्माला घातलं मात्र ट्रेजडी किंग नावानं प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार एक असे अभिनेता आहेत ज्यांची बात काही औरच आहे. 70-80 च्या दशकात अनेक अभिनेत्री त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेकजणी तासंतास त्यांची वाट पाहत असत.

आज दिलीप कुमार 97 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 डिसेंबर 1922 मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे जन्मलेले दिलीप कुमार सध्या सिनेसृष्टीपासून दूर असले तरी एकेकाळी याच बॉलिवूडवर त्यांनी एकहाती राज्य केलं होतं. त्यामुळे आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत.

…आणि कार्यक्रमात ढसाढसा रडायला लागली दीपिका पदुकोण, VIDEO VIRAL

 

View this post on Instagram

 

Wishing a very happy birthday to the most beautiful women in the world ❤️ #Repost @dilipkumarfc • • • • • • One of the best pics of Yusuf-Saira❤️☙ #DilipKumar #sairabanu #tragedyking #institutionofacting #legendarykhan #theultimatemethodactor #madhubala #srk #shahrukhkhan #kingkhan #bollywood #oldbollybollywood #instabolly #mumbai #india #instagram #like4like #tagsforlike #followforfollow #instagrammers #bollywoodactor #badshah #greatestactor #love #yusufsaira

A post shared by Admin: Muskan Chheda ✨ (@dilipkumarfc) on

दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान असं आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी हे नाव बदलून दिलीप कुमार असं केलं. त्यावेळी दिलीप कुमार त्यांच्या सिनेमांसोबतच लव्ह रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत राहत असत. मधुबालाशी त्यांची जवळीक तर खूपच गाजली होती. एकदा तर दिलीप कुमार यांच्यामुळे मधुबाला यांना जेलमध्ये जावं लागणार होतं असं म्हटलं जातं. पण अचानक असं काही झाली की त्या बचावल्या.

अंगावर शहारे आणणारा 'छपाक', मन हेलावणारा दीपिका पदुकोणचा अभिनय

खरं तर दिलीप कुमार यांचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. पण सायरा बानो यांच्याशी असलेलं त्यांचं नातं शेवटपर्यंत टिकलं. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये लग्न केलं. त्यावेळी सायरा अवघ्या 22 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. पण सायरा यांच्या मते त्या वयाच्या 12 व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दिलीप कुमार यांना जेव्हा ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांच्या वयातील अंतर आणि 2 वेळा अयशस्वी ठरलेलं प्रेम यामुळे ते सायरा यांच्याशी लग्न करण्याचा विचार टाळत होते मात्र नंतर ते सुद्धा सायरा बानोंच्या प्रेमात पडलेच.

असंही म्हटलं जातं की त्यावेळी सायरा बानो राजेंद्र कुमार यांच्या प्रेमात होत्या. मात्र त्यांचं हे नातं सायरा यांच्या आईला आवडलं नव्हतं. कारण राजेंद्र कुमार विवाहित होते. त्यामुळे सायरा यांच्या आईनं दिलीप कुमार यांना सायरांची समजूत काढण्यास सांगितलं आणि त्यासोबतच सायराशी लग्न करण्याची विनंतीही केली. यानंतर सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये लग्न केलं.

घरी आल्यानंतर व्हायरल झाला लता दीदींचा 'हा' PHOTO, पाहून वाढेल चिंता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या