S M L
Football World Cup 2018

हॅपी बर्थडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान!

आज मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस. आमिर 53 वर्षांचा झाला.

Sonali Deshpande | Updated On: Mar 14, 2018 11:07 AM IST

हॅपी बर्थडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान!

14 मार्च : आज मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस. आमिर 53 वर्षांचा झाला. पण ही 53 वर्ष त्याच्याकडे पाहून अजिबातच वाटत नाहीत. इतकं त्यानं स्वत:ला फिट अाणि फाइन ठेवलंय.

आपल्या कामाला नेहमी महत्त्व देणारा अामिर खान अनेक वादांमध्येही अडकला होता. अगदी ' बायको म्हणतेय देश असुरक्षित वाटतो' या विधानापासून ते त्याच्या कुठल्याही अॅवाॅर्ड सोहळ्याला न जाण्याच्या निर्णयापर्यंत. तो नेहमीच सडेतोड वागलाय. आणि म्हणूनच तो चाहत्यांचा लाडका आहे.

आमिरनं मादाम तुसाँमध्ये आपला पुतळा बसवण्यासाठी नकार दिला होता. त्याचं म्हणणं, की पुतळ्यापेक्षा तुम्ही माझं काम पाहा. ते महत्त्वाचं आहे.

आजही आमिर जोधपूरमध्ये 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सेटवरच त्याचा वाढदिवस साजरा होईल. न्यूज18लोकमतच्या आमिरला खूप खूप शुभेच्छा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close