रिसेप्शन पार्टीमध्ये सुंदर दिसत होती खासदार नुसरत जहां, पाहा PHOTO

नुसरत जहांच्या रिसेप्शन पार्टीत पाहुण्यांसााठी शाकाहारी जेवणं ठेवण्यात आलं. शाकाहारी जेवण ठेवण्यामागचं खरं कारण नुसरतचा नवरा निखील जैन आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 09:36 PM IST

रिसेप्शन पार्टीमध्ये सुंदर दिसत होती खासदार नुसरत जहां, पाहा PHOTO

मुंबई, 04 जुलै- अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहां सध्या प्रत्येक दिवशी चर्चेत असते. आज नुसरतने जगन्नाथ रथ यात्रात सहभाग घेतला होता. यानंतर संध्याकाळी तिने आपल्या चाहत्यांना एक सरप्राइज दिलं. नुसरतने तिच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली. याच पार्टीतले काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नुसरत फारच सुंदर दिसत आहे. यावेळी नुसरतची जवळची मैत्रीण मिमी चक्रवर्तीही रिसेप्शनला उपस्थित होती. नुसरतने मरून रंगाचा ड्रेस घातला होता. नवऱ्यासोबत प्रसारमाध्यमांना पोज देताना ती फार लाजत होती.

या पार्टीला अनेक पाहुण्यांसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पोहोचल्य होत्या. नुसरतने पार्टी सुरू होण्यापूर्वीच ममता यांच्यासोबत प्रसारमाध्यमांसमोर फोटो काढले. कोलकत्यातील आयटीसी रॉयल हॉटेलमध्ये हे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. आजचा दिवस निखील जैन आणि नुसरत दोघांसाठीही फार खास आहे. त्यामुळेच खाण्याच्या मेन्यूपासून ते सजावटीपर्यंत सगळ्याच गोष्टींची काळजी घेण्यात आली.

Video- Rahul Gandhi नी राजीनामा दिल्यानंतर पाहिला आयुष्मानचा Article 15 सिनेमा

हे रिसेप्शन थोडं खास आहे कारण यावेळी शाकाहारी जेवणच असणार आहे. शाकाहारी जेवण ठेवण्यामागचं खरं कारण नुसरतचा नवरा निखिल आहे. निखीलचं संपूर्ण कुटुंब शाकाहारी आहे. त्यामुळे रिसेप्शनमध्ये वाढण्यात येणारं जेवणही शाकाहारीच असणार आहे. नुसरतच्या जवळच्या लोकांनी मीडियाला सांगितलं की, नुसरतच्या लग्नात इटॅलियन, बंगाली, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ ठेवण्यात आले होते.

Loading...

संजय दत्तच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं निधन, त्रिशाला दत्तने शेअर केली भावुक पोस्ट

नुसरतने १९ जूनला निखिल जैनशी तुर्कीमध्ये लग्न केलं. दोघांचं लग्न हा संपूर्ण मीडियासाठी चर्चेचा विषय होता. नुसरतने यावेळी ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं. यानंतर कपाळावर कुंकू आणि लाल बांगड्या घालून जेव्हा नुसरतने संसदेत शपथ घेतली तेव्हा साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून होत्या.

प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यात पाण्यात केलं फोटोशूट

SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...