सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर या TMC खासदाराने शेअर केले हनीमून फोटो; झाल्या ट्रोल

सुषमा स्वराज Sushma Swaraj यांच्या निधनानंतर खासदार नुसरत जहाँ Nusrat Jahan यांनी शेअर केला आपला हनीमून फोटो. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला. बंद करा हा तमाशा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नुसरत यांच्यावर टीका केली.

  • Share this:

तृणमूलच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांना सोशल मीडियावर या फोटोंमुळे चांगलीच टीका सहन करावी लागली.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाचं वृत्त आलं त्यानंतरही नुसरत जहाँ यांनी आपल्या हनिमूनचे फोटो शेअर करण्यात धन्यता मानली, याबद्दल नेटकऱ्यांनी नुसरत यांना ट्रोल केलं.

नुसरत जहाँ यांचं गेल्या महिन्यात लग्न झालं. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे आणि आता त्यांनी शेअर केलेले हनिमूनचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

कोलकात्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्याशी त्यांचा विवाह झालाय आणि आता ते दोघं हनिमूनला रवाना झाले आहेत.

संसदेत तिहेरी तलाक, कलम 370 सारख्या गंभीर विषयांवर चर्चा सुरू असताना या खासदार बाई पिकनिक कऱण्यात मशगूल आहेत आणि फोटो शेअर करत होत्या, अशा कमेंट्स नुसरतच्या या फोटोंवर आल्या आहेत.

नुसरत जहाँ यांनी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर हा फोटो शेअर केला. त्यामुळे त्यांना टीकेचं धनी व्हायला लागलं.

बंगाली अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ राजकारणात प्रवेश केल्यानंतर खूपच चर्चेत आहे. मात्र पहिल्याच दिवशी तिला भांगात सिंदूर आणि मंगळसूत्र घालून आल्यानं ट्रोल व्हावं लागलं. याअगोदरही नुसरत यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत....

अनेकांनी तिच्या ड्रेसिंगवर टीका केली. ज्यानंतर नुसरतनंही त्यांना सडेतोड उत्तर देतं त्यांची तोंडं बंद केली. त्यानंतर नुसरत पुन्हा एकदा चर्चेत आली.

नुसरतनं नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे.

आपल्या बीझी शेड्यूलमधून वेळ काढून लग्नानंतर जवळपास 2 महिन्यांनंतर नुसरत आणि निखिल हनीमूनसाठी गेली आहे.

याठीकाणचे फोटो नुसरतनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्या ती वेस्टर्न आउटफिट्समध्ये दिसत असून नेहमीप्रमाणे ग्लॅमरस दिसत आहे.

नुसरतनं तिच्या हनीमूनचे फोटो शेअर करताना लिहीलं, ‘हे चांगलं होईल की, तुमचं डोकं ढगांमध्ये असेल आणि तुम्हाला माहीत असेल की तुम्ही कुठे आहात... स्वर्ग जागेत नाही तर तर सुंदर क्षण, त्या क्षणाला त्या ठिकाणी असलेल्या सौंदर्यात दडलेला असतो’

नुसरत आणि निखिलचे हे फोटो पाहिल्यावर ते सध्या मालदीव्समध्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र तिनं ती कुठे आहे त्या लोकेशन विषयी कोणतीही माहीती दिलेली नाही.

नुसरत जहाँ 19 जूनला कोलकाताचा प्रसिद्ध बिझनेसमन निखिल जैनशी लग्नाच्या बेडीत अडकली. त्यांनी टर्की येथे मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न केलं. त्यांचं लग्न बराच काळ सोशल मीडियावर चर्चेत राहीलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 09:00 AM IST

ताज्या बातम्या