कोलकाता, 19 नोव्हेंबर : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं शहरातील अपोलो ग्लेनीग्लेस रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी तिच्या आरोग्याशी संबंधित अफवांवर उत्तर दिलं आहे.
नुसरतला रुग्णालयात दाखल करताच अनेक अफवा पसरल्या होत्या. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तिला रुग्णालयात दाखल केलं. तसेच झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्यानं तिची प्रकृती बिघडलं अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नुसरत जहाँला अस्थमाचा त्रास आहे. ती इनहेलरचा वापर करते. पण रविवारी हा त्रास जास्त झाला आणि इनहेलर निरुपयोगी ठरले. सध्या ती ठीक आहे. नुसरत जहाँबद्दल पसरलेल्या अफवांचे खंडन करताना कुटुंबीयांनी सांगितले की, आम्हाला माहिती आहे अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत. आम्ही आधीच असं काही नाही हे सांगितलं आहे. तिची प्रकृती ठीक आहे आणि आम्ही कुटुंबीय तिच्यासोबत होतो.
अभिनेत्री शमा सिकंदरचा BOLD अवतार, व्हायरल झाले PHOTOS
Loading...
View this post on Instagram
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस सूत्रांनी अशी माहिती दिली की, पती निखिल जैनचा वाढदिवस साजरा केल्यानंतर नुसरतने औषधांचा ओव्हरडोस घेतला. ज्यामुळे तिची तब्येत बिघडली होती. रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नुसरतच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानतंर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. औषध, गोळ्या जोपर्यंत सुरु आहेत तोपर्यंत तिला आराम करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
नवाझ-अथियाला पायरसीचा फटका, 'या' वेबसाइटवर 'मोतीचूर-चकनाचूर' झाला लीक
अभिनेत्री नुसरत या आता संसदेत खासदार आहेत. टीएमसीची सर्वात सुंदर खासदार नुसरत जहाँ यांनी तुर्कीत डेस्टिनेशन वेडिंग केलं. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या नुसरत या लोकसभा निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झाल्या.
वरुण धवननं WWE रेसलरला शिकवला बॉलिवूड डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
=======================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा