TMC खासदार नुसरत जहांने लग्नानंतर साजरा केला पहिला सण, PHOTO VIRAL

नुसरत एवढी सुंदर दिसत होती की, निखिलचीही तिच्या चेहऱ्यावरून नजर दुसरीकडे वळली नाही

  • Share this:

अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां दरदिवशी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येते. नुकतेच तिने स्वतःचे हनीमून फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. काही क्षणांत तिचे हे फोटो व्हायरल झाले होते.

आता पुन्हा एकदा नुसरत तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये ती पुन्हा एकदा नवरीसारखी नटलेली दिसते. नुसरतसोबत तिचे पती निखिल जैनही आहे. दोघं मिळून तीजच्या विधी पूर्ण करत आहेत. या फोटोंमध्ये नुसरत खरंच खूप सुंदर दिसते.

रॉयल रेड रंगाची साडी, केसांत मोगऱ्याचा गजरा, सिंदरू, हातात बांगड्या आणि दागिन्यांनी सजलेल्या नुसरतकडे पाहतच रहावसं वाटतं.

नुसरत एवढी सुंदर दिसत होती की, निखिलचीही तिच्या चेहऱ्यावरून नजर दुसरीकडे वळली नाही. त्यामुळेच साऱ्या फोटोंमध्ये निखिल नुसरतकडे एकटक पाहताना दिसत आहे.

नुसरतने एकूण सहा फोटो शेअर केले. या फोटोंना कॅप्शन देताना नुसरतने लिहिले की, ‘माझं पहिलं सिंधारा खास करण्यासाठी धन्यवाद. माझ्यासोबत राहिल्याबद्दल निखिल जैन तुझे आभार.’ या फोटोंमध्ये निखिल आणि नुसरतची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे.

या फोटोंवर नुसरतला अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत. काही तिला तिच्या धर्माची आठवण करून देत आहेत तर काही नवदांपत्याच्या केमिस्ट्रीवर फिदा आहेत.

नुसरतने जेव्हा हनीमुनचे फोटो शेअर केले होते तेव्हा तिला काहींनी तिच्या इस्लाम धर्माची आठवण करून दिली तर काहींनी संसदेतल्या कामांची आठवण करून दिली. एवढं असलं तरी नुसरत तिला येणाऱ्या कमेंटची फारशी पर्वा करत नाही.

नुसरतने 19 जूनला कलकत्याचा व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केलं. लग्नानंतर लाल बांगड्या, सिंदूर आणि मंगळसूत्र घालून नुसरत जेव्हा संसदेत आली होती तेव्हा सारेच तिला पाहत राहिले होते.

यानंतर तिच्याविरोधात फतवा काढण्यात आला होता. या फतव्याला उत्तर देताना नुसरत म्हणाली की, ‘मी सर्व धर्मांचा मान राखते. मी अजूनही मुस्लिम आहे. मी काय घालावं आणि काय घालू नये याबद्दल त्या लोकांनी मला सांगू नये.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या