News18 Lokmat

VIRAL VIDEO : खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँचा बोल्ड डान्स

तृणमूल काँग्रेसच्या नव्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांनी संसदेत केलेलं फोटोसेशन चांगलंच गाजलं.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 02:42 PM IST

VIRAL VIDEO : खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँचा बोल्ड डान्स

मुंबई, 29 मे : ममता बॅनर्जींचा राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेसमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ लोकसभा निवडणुकांच्या सुरुवातीपासूनच खूप चर्चेत होत्या. पण निवडणूकीत विजयी झाल्यानंतरही या दोघींबद्दलच्या चर्चा थांबायचं नाव घेत नाही आहेत. यावर्षी दोन नवे सुंदर चेहरे संसदेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पण दरम्यान या दोघींचा एक टिक टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ निर्माता राम गोपाल वर्मानं त्याच्या ट्विटरवर शेअर केला. या टिक टॉक व्हिडिओमध्ये मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ एका इंग्रजी गाण्यावर बोल्ड डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर मिमी आणि नुसरत दोघीही खूप खूश आहेत आणि ते या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना राम गोपाल वर्मानं, 'Wow Wow Wow!!! बंगालच्या नव्या खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ. आपला देश खूपच प्रगतीशील आहे. अशा खासदारांचं स्वागत आहे ज्यांना पाहून डोळ्यांना चांगलं वाटतं.'


Loading...


मिमी चक्रवर्तीनं पश्चिम बंगालच्या जाधवपूर लोकसभा निवडणूक मतदार संघातून विजय मिळवला आहे. तर नुसरत जहाँ बसीरहाट लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वी या दोघीही संसदेत पोहोचल्या होत्या. ज्यानंतर या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र या फोटोंमुळे या दोघींनाही सर्वत्र ट्रोल व्हावं लागलं. युजर्सना मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांच्या संसदेच्या आवारात सेल्फी घेणं आणि ग्लॅमरस अंदाजात पोझ देणं आवडलेलं नाही.
 

View this post on Instagram
 

Remember your dreams and fight for them🙏 #gratitude #Obliged


A post shared by Mimi (@mimichakraborty) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...