संसदेत पोहोताच 'या' TMC खासदारानं केली लग्नाची घोषणा, लाखो चाहते झाले निराश

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे मात्र तिच्या लाखो चाहत्यांची मनं दुखावली गेली आहेत.

  • Share this:

बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ नुकतीच लोकसभा निवडणूक जिंकल्यानं यंदा संसदेत मिमी चक्रवर्तीसोबत आणखी एका सुंदर चेहऱ्याची भर पडली आहे. पण तिनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे मात्र तिच्या लाखो चाहत्यांची मनं दुखावली गेली आहेत.

बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर ती लग्न करणार असल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली.

नुसरतने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्या साखरपुड्याची अंगठी दिसत आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. नुसरतनं तिचा बॉयफ्रेंड निखिल जैनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये तृणमूल काँग्रेस पार्टीकडून निवडून आलेल्या नुसरत जहाँनं काही दिवसांपूर्वी संसद भवनाच्या आवारातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण त्यामुळे या ठिकाणी भारतीय पारंपरिक कपडे परिधान न केल्यानं नुसरत आणि मिमी चक्रवर्ती यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं होतं.

बसीपहाट मतदार संघातून नुसरत जहाँनं भाजपच्या सायंतन बासू यांना साडेतीन लाख मतांनी हरवलं. नुसरतला एकूण 7 लाख 82 हजार 78 मतं मिळाली. सायंतन बासू यांना हरवून नुसरत जहाँ पहिल्यांदा खासदार बनली आहे.

2010मध्ये एक सौंदर्य स्पर्धा जिंकून आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केल्यानंतर नुसरतला 2011मध्ये बंगाली सिनेमा 'शोतरू'मध्ये पहिला ब्रेक मिळाला. तिने आतपर्यंत अनेक हिट बंगाली सिनेमात काम केलं आहे. त्यानंतर ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असं वाटत असतानाच तिनं राजकारणात एंट्री घेत सर्व समीकरणंच बदलून टाकली.

नुसरतनं एक फोटो साशल मीडियावर शेअर करत ती लवकरच लग्न करणार असल्यांच स्पष्ट केलं. नुसरतचा होणारा नवरा निखिल जैन हा कोलकातामधील एक प्रसिद्ध व्यवसायिक आहे. तुर्कीच्या इस्तांबुल शहरामध्ये हे दोघंही डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 04:17 PM IST

ताज्या बातम्या