इतकी सुंदर दिसते TMC खासदार नुसरत जहाँ, 'या' ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग

अभिनेत्री नुसरत जहाँनं तृणमूल काँग्रेसची खासदार झाल्यानंतर काही दिवसातच तिच्या लग्नाची घोषणा केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 06:30 AM IST

इतकी सुंदर दिसते TMC खासदार नुसरत जहाँ, 'या' ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग

लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं तृणमूल काँग्रेसची खासदार झाल्यानंतर काही दिवसातच तिच्या लग्नाची घोषणा केली होती.

लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं तृणमूल काँग्रेसची खासदार झाल्यानंतर काही दिवसातच तिच्या लग्नाची घोषणा केली होती.

नुसरत जहाँच्या लग्नाच्या घोषणेनंतर आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या लग्नाशी निगडित माहिती मिळायला सुरुवात झाली आहे.

नुसरत जहाँच्या लग्नाच्या घोषणेनंतर आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या लग्नाशी निगडित माहिती मिळायला सुरुवात झाली आहे.

नुकताच नुसरतनं तिच्या वडीलांसोबतचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. या फोटोमध्ये नुसरतच्या चेहऱ्याला हळद लागलेली दिसत आहे.

नुकताच नुसरतनं तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. या फोटोमध्ये नुसरतच्या चेहऱ्याला हळद लागलेली दिसत आहे.

Loading...

नुसरतनं काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिपबद्दल तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. ती कोलकाताचा प्रिसिद्ध व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

नुसरतनं काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिपबद्दल तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. ती कोलकाताचा प्रसिद्ध व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

नुसरतच्या हळदीच्या फोटोंवरून तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाल्याचं समजतं. नुसरत आणि निखिल 19 ते 21 जूनच्या दरम्यान लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नुसरतच्या हळदीच्या फोटोंवरून तिच्या लग्नाच्या विधिंना सुरुवात झाल्याचं समजतं. नुसरत आणि निखिल 19 ते 21 जूनच्या दरम्यान लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

17 जूनला प्रीवेडिंग सेरेमनी आणि त्यानंतर 18 जूनला संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

17 जूनला प्रीवेडिंग सेरेमनी आणि त्यानंतर 18 जूनला संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

नुसरत जहाँ बंगाली सिने सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे नुसरत सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे.

नुसरत जहाँ बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे नुसरत सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे.

नुसरत आणि निखिलनं त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी टर्कीच्या इस्ताम्बुल शहराची निवड केली आहे आणि या ठिकणी डेस्टिनेशन वेडिंग करणारी नुसरत ही पहिली टॉलिवूड अभिनेत्री आहे.

नुसरत आणि निखिलनं त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी टर्कीच्या इस्ताम्बुल शहराची निवड केली आहे आणि या ठिकणी डेस्टिनेशन वेडिंग करणारी नुसरत ही पहिली टॉलिवूड अभिनेत्री आहे.

इस्ताम्बुलमध्ये लग्नसोहळा पार पडल्यानंतर हे कपल भारतातही रिसेप्शन पार्टी देणार आहे.

इस्ताम्बुलमध्ये लग्नसोहळा पार पडल्यानंतर हे कपल भारतातही रिसेप्शन पार्टी देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...