Home /News /entertainment /

या अभिनेत्रीनं पहिल्यांदाच केल्या पुरणपोळ्या !कशा झाल्या ते पाहा..

या अभिनेत्रीनं पहिल्यांदाच केल्या पुरणपोळ्या !कशा झाल्या ते पाहा..

सर्वांना उत्सुकता असते कलाकारांना स्वयंपाक येतो का..मात्र हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना अनेक कलाकारांचा किचनमधील वावर पाहण्यास मिळतो. लॉकडाऊनच्या काळात तर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून किचनमधील कलाकारी दाखवली.

पुढे वाचा ...
  मुंबई, 19 मार्च- अभिनेत्री तितिक्षा तावडे (  titeeksha tawde ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे विविध व्हिडिओ तसेच फोटो शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. तितिक्षाने होळीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ म्हणजे दुसरा तिसरा कशाचा नसून पुरणपोळी ( how to make puranpoli ) करतानाचा आहे. तिचा पुरणपोळी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तो नेमका फसलाय की जमलाय हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते. अभिनेत्री तितिक्षा तावडे इन्स्टावर पुरणोपोळी करताना एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,ज पहिल्यांदा पुरणपोळ्या बनवल्या. मज्जा आली. आता खाणार. अजुन मज्जा येईल. तुम्हा सर्वांना happy holi 💙💜💛 तिचा पहिल्याच प्रयत्न यशस्वी झाल्याचा दिसत आहे. मस्त अशा पुरणपोळ्या तिनं तयार करून होळीसाठी नैवेद्य देखील तयार केला आहे. अगदी पुरण करण्यापासून ते पोळी पोळपाटावर लाटण्यापर्यंत तिनं या व्हिडिओत दाखवल आहे. शिवाय पुरणपोळी मस्त तिनं भाजल्याची देखील दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह सेलेब्स देखील कमेंट येत आहे. सर्वांनी तिचं कौतुक केले आहे. वाचा-'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या लेकीचा हटके स्टाईल वाढदिवस साजरा तितिक्षा तावडेची नुकतीच सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत एंट्री झाली आहे. या मालिकेत ती वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. तितीक्षाने याआधी ‘तु अशी जवळी रहा, सरस्वती अशा मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती शाब्बास मिथू या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. खेळाडूप्रमाणे फिट दिसण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर बरेच कष्ट घेतले आहेत. त्यामुळे सिनेमातील तितीक्षाची ही भूमिका थोडी खास असणार आहे.
  सर्वांना उत्सुकता असते कलाकारांना स्वयंपाक येतो का..मात्र हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना अनेक कलाकारांचा किचनमधील वावर पाहण्यास मिळतो. लॉकडाऊनच्या काळात तर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून किचनमधील कलाकारी दाखवली. विविध रेसिपी शेअर केल्या..काहींना तर चांगला प्रतिसाद देखील मिळाला. अनेक मराठी अभिनेत्रींचे तर रेसिपीज चॅनेल देखील आहे. यामध्ये मेघा धाडे, निवेदिता सराफ, सई लोकूर याचं नाव घेता येईल. या अभिनेत्री विविध रेसिपी दाखवत असतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या