मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prathamesh Parab: प्रथमेश परबला मित्रांनी दिलं इतकं महागडं गिफ्ट; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

Prathamesh Parab: प्रथमेश परबला मित्रांनी दिलं इतकं महागडं गिफ्ट; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

 प्रथमेश परब

प्रथमेश परब

टाईमपासचा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबचा नुकताच 29 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त त्याला मित्रांनी खास भेटवस्तू दिली आहे. त्याची सगळीकडे चर्चा होतेय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 01 डिसेंबर : प्रथमेश परब ने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.  'आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिल से हम अमीर है अमीर', अशा एकाहून एक पैसा वसूल डायलॉगमुळे प्राजूचा दगडू लोकप्रिय झाला होता. टकाटक आणि टाइमपास मध्ये मुख्य पात्राची भूमिका करण्यापूर्वी त्याने बालक-पालकमध्ये एक छोटीशी भूमिका  साकारली होती. प्रथमेशने आपल्या अभिनयाचा ठसा फक्त मराठीच नाही. तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील उमटवला. नुकतंच गाजत असलेल्या दृश्यम 2 या चित्रपटात प्रथमेशने महत्वाची भूमिका साकारली आहे. अशा प्रथमेशचा नुकताच 29 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त त्याला मित्रांनी खास भेटवस्तू दिली आहे.

प्रथमेशनं मराठी सिनेसृष्टीत स्वत:अशी वेगळी ओळख निर्माण केली. वैयक्तिक किंवा पर्सनल लाइफमध्ये दगडू कायमच स्ट्रगल करत आला आहे. असा प्रथमेश नुकताच त्याचा 29 वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडियावर प्रथमेशवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण आता चर्चा होतेय ती प्रथमेशला मिळालेल्या खास गिफ्टची.  वाढदिवसानिमित्त प्रथमेशला मित्रांनी एक गिफ्ट दिलं. त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मित्रांनी प्रथमेशला फारच महागडं गिफ्ट दिलं  आहे.

हेही वाचा - Prathamesh Parab: दगडू दादूसला मिळाली रिअल लाईफ प्राजक्ता? प्रथमेशच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा

व्हिडिओत प्रथमेशला त्याचे जवळचे मित्र एक खोक्यात पॅक केलेली वस्तू भेट देताना दिसत आहेत. प्रथमेशला आधी वाटतं कि खूप महागडं गिफ्ट आहे पण ते जेव्हा तो ते गिफ्ट उघडतो तर त्यात चक्क साध्या स्लीपर आहेत. हे पाहून त्याचा चांगलाच हिरमोड होतो पण मित्रांमध्ये एकच हशा पिकतो. या व्हिडिओला प्रथमेशने ''अरे इतके महाग footwear कोन देत यार... Thank you मित्रांनो...रिटर्न गिफ्ट लवकरच देतो'' असं भन्नाट कॅप्शन दिलं  आहे.

प्रथमेशने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना पण हसू आवरलं नाही. त्याचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हयरल होताना दिसत आहे.

मराठी सिनेमासोबतच प्रथमेशने बॉलिवूडमध्येही अभिनय करुन त्याच्या चाहत्यांची मने जिंकली होती. प्रथमेशने दृश्यम सिनेमातून घराघरांत पोहचला. दृश्यम पाठोपाठ प्रथमेश नुकताच आता दृश्यम 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दृश्यमच्या पहिल्या भागाप्रमाणेच दृश्यम २ हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पणातच अजय देवगण सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने प्रथमेशचं सगळीकडेच कौतुक होत आहे.

First published: