Home /News /entertainment /

दिग्दर्शक रवी जाधवचं ओटीटीवर पदार्पण, बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांबरोबर घेऊन येतोय हिंदी वेब सिरीज

दिग्दर्शक रवी जाधवचं ओटीटीवर पदार्पण, बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांबरोबर घेऊन येतोय हिंदी वेब सिरीज

बँजो या हिंदी सिनेमानंतर आता दिग्दर्शक रवी जाधव हिंदी वेब सिरीज घेऊन येत आहे.

  मुंबई, 06 जुलै:  टाईमपास ( Timepass) नटरंग ( Natarang) बालगंधर्व ( Balgandharva) न्यूड ( Nude) सारख्या सिनेमातून महत्त्वाचे विषय प्रेक्षकांसमोर मांडून  आपली नवी ओळख निर्माण करणारा मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव ( Ravi Jadhav) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री करणार आहे. बँजो या हिंदी सिनेमानंतर आता रवी जाधव हिंदी वेब सिरीज घेऊन येत आहे.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. वेब सिरीजचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.  त्याचप्रमाणे रवी जाधव आणि लेखक क्षितीज पटवर्धन ( Kashitij Patvardhan) ही जोडगोडी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. क्षितीज पटवर्धन आणि रवी जाधव यांनी याआधी टाईमपास सारख्या धम्माल सिनेमात एकत्र काम केलं आहे.  मराठीतील दोन तगडे कलाकार आता हिंदी वेब विश्वात नवी कलाकृती घेऊन येणार आहेत. या वेब सिरीजची निर्मिती अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी केली आहे. समांतर या प्रसिद्ध वेब सिरीजची निर्मितीही त्यांनीच केली आहे.  दोघांना त्याच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. रवी जाधव हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नटरंग आणि बालगंधर्व या दोन उत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे बालक पालक, टाइमपास, न्यूड हे प्रचंड  लोकप्रिय झालेत. रवी जाधवचं त्याच्या सिनेमांसाठी नेहमीच कौतुक करण्यात आलं आहे. हेही वाचा - Resham Tipnis:रेशम टिपणीसची 'या' हिंदी मालिकेत एंट्री; बिग बॉस मराठीमधील दोन कलाकार पुन्हा आमने सामने
  तर  क्षितिज पटवर्धन यांचीही पटकथा लेखक, नाट्यदिग्दर्शक, नाटककार आणि गीतकार अशी ओळख आहे.  त्यांना 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार, प्रतिष्ठित तरुण तेजंकित पुरस्कार 2019 मिळालेला आहे. टाईमपास, टाइम प्लीज, आघात, वाय झेड, क्लासमेट्स या सिनेमांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे. वेब सिरीजची निर्मिती ही GSEAMS हे करत आहेत. या आधी त्यांनी मोगरा फुलाला, बोनस, फुगे, अर्जुन आणि कार्तक सारखे हिट मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी दरम्यान वेब सिरीजच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला. GSEAMS निर्मित नक्षलबारी आणि समांतर 1 आणि 2, ओटीटीवरील यशस्वी झाले.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या