मुंबई, 05 डिसेंबर : सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आहे. राणा अंजली म्हणजेच अभिनेता हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर यांनी पुण्यात शाही विवाह सोहळा केला. त्यानंतर माझा होशील ना मालिकेतील अभिनेता आशय कुलकर्णीनं देखील कोकणात निसर्गरम्य ठिकाणी लग्नगाठ बांधली. या दोन टेलिव्हिजन अभिनेत्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मराठमोळा दिग्दर्शक आणि अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. हा दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. रवीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण मध्येच रवीनं दुसऱ्यांदा लग्न करण्याचं कारण काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या यामागचं कारण.
दिग्दर्शक अभिनेता रवी जाधव पत्नी मेघना जाधवबरोबर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. दोघेही मराठी सिनेसृष्टीतील लव्हेबल कपल म्हणून ओळखले जातात. रवीच्या आयुष्यात मेघनाचा खूप मोठा वाटा आहे. मेघनानं तिचं प्रोडक्शन हाऊसही सुरू केलं आहे. दरम्यान आज दोघांच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळाले. या फोटोमध्ये मेघना आणि रवी सप्तपदी घेताना दिसत आहेत. दोघांना सिनेसष्टीतील सगळ्या कलकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रवीची पत्नी मेघना जाधव हिनं सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर करत त्याखाली छान पोस्टही शेअर केली आहे. तिनं म्हटलंय, 'आज आमच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली. आम्ही 1992मध्ये एकमेकांना भेटलो आणि 1998मध्ये लग्न केलं. अविस्मरणीय आठवणींनी भरलेला हा आमचा प्रवास असाच अविरतपणे सुरू राहू दे'.
View this post on Instagram
मेघना आणि रवी यांच्या एकमेकांबरोबरच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे, सुयश टिळक, मंजिरी ओक, सुकन्या मोने अशा अनेक कलाकारांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रवीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं तर रवी जाधव दिग्दर्शिक 'ताली' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री सुष्मिता सेन प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'अटल' या सिनेमाचीही रवीनं नुकतीच घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.