अरे ही तर कार्बन कॉपी! करिश्मासारखी दिसणारी 'ती' नक्की आहे तरी कोण?

अरे ही तर कार्बन कॉपी! करिश्मासारखी दिसणारी 'ती' नक्की आहे तरी कोण?

मागच्या काही दिवसांपासून करिना कपूरची बहीण करिश्मा कपूर हुबेहूब दिसणारी एक तरुणी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जून : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेलेलं टिकटॉक मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. आधी टिकटॉक विरुद्ध युट्यूब आणि मग बॅन टिकटॉक. वेगवेगळ्या कारणांनी टिकटॉकची चर्चा झाली. सध्या फक्त सामान्य लोकच नाही तर अनेक सेलिब्रेटी सुद्धा बॅन करण्याची मागणी करत आहेत. यात मुकेश खन्ना, अनुपम खेर, बिग बॉस फेम हिंदुस्तानी भाऊ यांचा समावेश होता. अर्थात वादांव्यतिरिक्त टिकटॉक इतर अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतं. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींच्या कार्बन कॉपी. आतापर्यंत टिकटॉकमुळे अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान, सुनील शेट्टी, श्रीदेवी आणि करिना कपूर याच्यासारखे हुबेहूब दिसणारे टिकटॉक स्टार सापडले आहेत.

सध्या मागच्या काही दिवसांपासून करिना कपूरची बहीण करिश्मा कपूर हुबेहूब दिसणारी एक तरुणी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अगदी हुबेहूब करिश्मा सारख्या दिसणाऱ्या या मुलीचे व्हिडीओ सध्या इंटरनेट धुमाकूळ घालत आहेत. या मुलीचं नाव हिना असून ती टिकटॉकवर करिश्माच्याच सिनेमाच्या डायलॉगचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. टिकटॉकवर हिनाचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

टिकटॉकवर हिनाचे व्हिडीओ पाहून सर्वच हैराण झाले आहेत. कारण हिना आणि करिश्माच्या चेहऱ्यात खूपच साम्य आहे. जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येत की, ती करिश्मा नाही तर तिच्यासारखी दिसणारी कोणीतरी मुलगी आहे. हिनाचे हे व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण तिला 'कुदरत का करिश्मा' असं म्हणताना दिसत आहेत.

करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती नुकतीच एकता कपूरच्या मेंटलहुड या वेब सीरिजमध्ये दिसली होती. बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिलेल्या करिश्मानं या वेबसीरिजमधून कमबॅक केलं आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुक सुद्धा झालं. या वेबसीरिजची कथा मातृत्वावर बेतली आहे. जी हे सांगण्याचा प्रयत्न करते की कशाप्रकारे एक आई तिच्या मुलांना सांभाळण्यासोबतच घर-ऑफिस आणि इतर बाहेरच्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडते.

First published: June 1, 2020, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading