'टायगर जिंदा है'चा थरारक ट्रेलर रिलीज

'टायगर जिंदा है'चा थरारक ट्रेलर रिलीज

या ट्रेलरमध्ये सलमान खान इराकमध्ये बंदिवान केलेल्या भारतीय परिचारिकांना सोडवण्याचं मिशन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. याच मिशनमध्ये सलमान आणि कतरिना यांची भेट होते.

  • Share this:

07 नोव्हेंबर : पुढच्या महिन्यात सल्लूमियाचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमाची सगळी टीम प्रमोशनच्या तयारीत दंग आहे. सिनेमातले कतरिना आणि सलमानची अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आल्यानंतर आता या सिनेमाचं ट्रेलर रिलीज करण्यात आलं आहे.

या ट्रेलरमध्ये सलमान खान इराकमध्ये बंदिवान केलेल्या भारतीय परिचारिकांना सोडवण्याचं मिशन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. याच मिशनमध्ये सलमान आणि कतरिना यांची भेट होते. या मोहिमेत कतरिना कैफही तितकीच धाडसी दिसत आहे.

या सिनेमासाठी सलमान आणि कतरिनाने ग्रीसच्या कडाक्याच्या थंडीमध्येही शूटिंग केलं. सिनेमाबरोबरच सलमान बिग बॉसच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.

'टायगर जिंदा हे' सिनेमाच्या निर्मात्यांनी कालच या सिनेमाचं एक पोस्टर रिलीज केलं होतं आणि सध्या हे ट्रेलर ट्रेंडिंग होतंय. अली अब्बास जाफर दिग्दर्शित सल्लूमियाचा हा सिनेमा 22 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.

First published: November 7, 2017, 4:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading