लेक शेर तर आई सव्वाशेर; टायगर श्रॉफची मॉम आयशा यांचा VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

लेक शेर तर आई सव्वाशेर; टायगर श्रॉफची मॉम आयशा यांचा VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

बॉलिवूडचा 'अॅक्शन स्टार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफपेक्षा (Tiger Shroff) सध्या त्याची आई आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून दिशा पटानीनंदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी: बॉलिवूडचा 'अॅक्शन स्टार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) फिटनेसच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. मात्र सध्या या दोघांपेक्षा त्यांच्या आईच्या फिटनेसची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या स्पर्धेत आता दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांची आई आयशा श्रॉफच उतरल्या असून, त्यांनी फिटनेसच्या बाबतीत या दोघांनाही मागं टाकलं आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) आयशा श्रॉफ (Ayesha Shroff)  यांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत असून, त्यात त्या डेडलिफ्ट करताना दिसत आहेत. हा अतिशय अवघड व्यायाम प्रकार आहे. आयशा श्रॉफ यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर जोरदार पसंती मिळत आहे.

आयशा श्रॉफ यांनी स्वत:च आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्या जीममध्ये 95 किलो वजनासह डेडलिफ्ट करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत टायगर श्रॉफसुद्धा दिसत आहे.

आयशा श्रॉफ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्या नेहमी आपला मुलगा टायगर आणि मुलगी कृष्णा यांच्योसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्युज मिळतात. चाहते आवर्जून त्यांच्या फोटो, व्हिडिओची वाट पाहत असतात. मुलांप्रमाणेच आयशा स्वतः फिटनेसबाबत किती जागरूक आहेत आणि त्यांना त्याची आवड असल्याचं या व्हिडिओवरून दिसून येतं. अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या हिंमतीचं खूप कौतुक केलं आहे. कृष्णा श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीनंदेखील कमेंट्स करत आयेशा यांचं कौतुक केलं आहे.

हे वाचा - नवरदेवाच्या हळदीसाठीच्या शर्टलेस पोझने चाहते घायाळ; PHOTO VIRAL

दरम्यान टायगर श्रॉफचे 'कॅसानोवा' हे दुसरं गाणं अलीकडेच युट्यूबवर रिलीज झालं आहे. पहिल्या गाण्याप्रमाणेच त्याच्या या गाण्यालासुद्धा प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. टायगर श्रॉफ या आधी 'बागी' अ‍ॅक्शन ड्रामाचा तिसरा भाग असलेल्या 'बागी 3' चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो 'गणपत' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं  दिग्दर्शन 'सुपर 30' चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल यांनी केलं आहे.

Published by: Aditya Thube
First published: January 25, 2021, 6:47 PM IST

ताज्या बातम्या