दिशाला डेट करतोस का? चाहत्याच्या प्रश्नावर टायगर म्हणाला, माझी लायकी...

दिशाला डेट करतोस का? चाहत्याच्या प्रश्नावर टायगर म्हणाला, माझी लायकी...

टायगरच्या एका चाहत्यानं त्याला तू दिशाला डेट करतोस का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना टायगरनं एक धक्कादायक वक्तव्य केलं.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याचा आगामी सिनेमा 'वॉर'मुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमात तो हृतिक रोशनसोबत दोन हात करताना दिसणार आहे. हे दोन स्टार अभिनेते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात नेमकं कोणतं वॉर रंगणार याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र याशिवाय टायगर नेहमीच चर्चेत असतो तो दिशा पाटनीमुळे. टायगर आणि दिशा एकमेकांना डेट करत असल्यांच्या चर्चा नेहमीच रंगतात मात्र हे दोघंही आम्ही फक्त एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचं सांगतात. अशातच आता टायगरनं दिशा बद्दल असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे सर्वच अवाक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Happy birthday D! 🍰🍰🍰🔥🔥🔥🐥🐥❤❤❤ @dishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

काही दिवसांपूर्वी टायगरनं त्याच्या इन्स्टाग्रमावर 'Ask Me Anything' सेशन सुरू केलं होतं. ज्यात त्याचे चाहते त्याला कोणताही प्रश्न विचारू शकत होते. यावेळी टायगरच्या एका चाहत्यानं त्याला तू दिशाला डेट करतोस का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना टायगरनं, 'माझी लायकी नाही' असं उत्तर दिलं. टायगरच्या या उत्तरानं सर्वांनाच धक्का बसला आहे. मागच्या अनेक काळापासून हे दोघं जवळपास सर्वच ठिकाणी एकत्र दिसतात. त्यामुळे हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं. मात्र टायगरच हे उत्तर कोणालाच अपेक्षित नव्हतं.

Zomato सिंगरचा व्हिडिओ व्हायरल; डिलिव्हरी बॉय झाला देशभरात फेमस!

याशिवाय यामध्ये टायगरला आणखी काही मजेशीर प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानं त्याची उत्तरंही  खूप गंमतीदार दिली. एका युजरनं विचारलं तु वर्जिन आहेस का? त्यावर टायगरन त्याला सांगितलं, अरे बेशरम माझे आई-बाबा सुद्धा मला फॉलो करतात. तर दुसऱ्या एका युजरनं त्याला तुझ्या किती गर्लफ्रेंड आहेत असा प्रश्न विचारला. त्यावर टायगरनं जास्त नाही असं उत्तर दिलं.

ख्रिस गेलच्या एक्स गर्लफ्रेंडला बॉलिवूडचा 'हा' दिग्दर्शक पाठवायचा अश्लील मेसेज

 

View this post on Instagram

 

#MYCALVINS @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दिशानं ती टायगरला इम्प्रेस करण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. ती म्हणाली, 'मी त्याला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो खूपच स्लो मोशन व्यक्ती आहे. मी त्याला इम्प्रेस करते आणि त्याला हे सांगते सुद्धा मात्र तरीही त्याच्यार काहीही फरक पडत नाही. त्याच्यासाठी मी जिमनॅस्टिक शिकले आणि त्यामुळे मला भारत सिनेमा मिळाला. ज्यात मी फायर रिंगच्या बाजूला फ्लिप्स केले. मात्र एवढं करुनही तो इम्प्रेस झाला नाही. मी अजून काय करू.'

Mission Mangal च्या अभिनेत्रींमध्ये झाली जबरदस्त कॅटफाइट? विद्यानं सांगितलं...

=========================================================================

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

Published by: Megha Jethe
First published: August 19, 2019, 8:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading