बॉलिवूडचा सगळ्यात फिट अभिनेता, नाव आहे 'जय हेमंत'

बॉलिवूडचा सगळ्यात फिट अभिनेता, नाव आहे 'जय हेमंत'

काय, तुम्हाला हे नाव माहित नाही? हो, खरंतर जय हेमंत या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्याबद्दल तुम्हाला बरंच काही माहित नाहीये.

  • Share this:

02 मार्च : आज धुळवड आहे. जगभरात आज रंगाचा उत्सव साजरा केला जात असताना आजच 2 मार्चला तरुणींचा फेव्हरेट अभिनेता जय हेमंत याचा वाढदिवस आहे. काय, तुम्हाला हे नाव माहित नाही? हो, खरंतर जय हेमंत या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्याबद्दल तुम्हाला बरंच काही माहित नाहीये. जय हेमंतने त्याच्या अभिनयाने, त्याच्या लुकने आणि त्याच्या जबरदस्त बॉडीने सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत.

मंडळी, आज बॉलिवूडचा लाडका अभिनेता म्हणजेच टायगर श्रॉफचा वाढदिवस आहे. टायगर श्रॉफचं पूर्ण नाव आहे जय हेमंत श्रॉफ. खरंतर जय हेमंतचं टायगर नाव पडण्यामागे एक भारीच गम्मत आहे. त्याचं झालं असं की, लहान असताना तो संगळ्यांना चावायचा आणि म्हणून जॉकी श्रॉफ यांनी त्याचं नाव टायगर असं ठेवलं.

टायगरची फिटनेस त्याची खास ओळख आहे. आता तुम्ही म्हणाल तो खातो तरी काय? पण तुम्ही जाणून थक्क व्हाल की टायगर श्रॉफ शाकाहारी आहे. त्याला कोणतेही व्यसन नाही आहे.

टायगर श्रॉफ मार्शल आर्ट्समध्ये मास्टर आहे. त्याने तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. टायगरच्या फिटनेसच्या चर्चा इतक्या की, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेदेखील त्याच्याकडून टिप्स घेतल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये आपल्या डान्स आणि अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या जय हेमंत म्हणजे टायगर श्रॉफला न्यूज18 लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा!

First published: March 2, 2018, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading