मुंबई 25 जून: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आपल्या धमाकेदार अॅक्शन सीन आणि डान्ससाठी ओळखला जातो. तो किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनचा (Michael Jackson) खूप मोठा फॅन आहे. तो मायकलला आपला गुरु मानतो. एक दिवस त्याच्यासारखी लोकप्रियता मिळवणं हे त्याचं स्वप्न आहे. आज 25 जून, आज मायकलचा स्मृतीदिन आहे. (tribute to Michael Jackson) या निमित्तानं टायगरनं एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मायकलच्याच शैलीत लॉकिंग पॉकिंग डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओद्वारे त्यानं आपल्या गुरुला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Michael Jackson Death Anniversary: ‘किंग ऑफ पॉप’चं 3 हजार कोटींचं घर आतून दिसतं कसं?
View this post on Instagram
‘ब्रिटनी स्पिअर्सला स्वातंत्र्य द्या’; रिया चक्रवर्तीची नवी मागणी
टायगरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मायकलच्या ‘द वे यु मेक मी फील’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे अगदी हुबेहुब त्याने मायकल सारखा डान्स केला आहे. टायगरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत 20 लाखांपेक्षा अधिक वेळा हा डान्स पाहिला गेला आहे.
मायकल जॅक्सन एक लोकप्रिय पॉप सिंगर होता. आश्चर्याची बाब म्हणजे गाण्यासोबतच तो आपल्या अनोख्या डान्स शैलीसाठीही प्रसिद्ध होता. त्याच्या नृत्य शैलीला आज लॉकिंग पॉकिंग म्हणून ओळखलं जातं. मायकल विशेषत: आपल्या मून वॉकसाठी प्रसिद्ध होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Tiger Shroff, Video viral